तरुण भारत

बुध्दीमत्तेला पैलू पाडणारे उपक्रम हवेत : वर्षा गायकवाड

ऑनलाईन टीम / पुणे : 


लहान विद्यार्थी हे उद्याचे लखलखणारे हिरे आहेत, त्यांना पैलू पाडण्यासाठी अंकनाद पाढे स्पर्धेसारखे उपक्रम उपयोगी ठरतील, अशा स्पर्धांमधील गुणवंतांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी शासन मदत करेल. त्यासाठी झूम मीटिंग द्वारे लवकरच बैठक आयोजित  केली जाईल’, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.


शालेय अभ्यासक्रमात तसेच परिपाठात पावकी, निमकी, अडीचकी, एकोत्रे या पारंपारिक पाढयांचा समावेश करण्याच्या मागणीवर विचार करू, असे आश्वासनही वर्षा गायकवाड यांनी दिले.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा लि आणि राज्य मराठी  विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात  आलेल्या  राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता मंत्रालयात मराठी भाषा विभागाचे  सहसचिव मिलिंद गवादे, विशेष कार्यअधिकारी चित्रा देशपांडे यांच्या हस्ते  झाले. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट विजेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली. ‘अंकनाद’ च्या उपक्रमाचे आणि विजेत्यांचे त्यांनी कौतुक केले.


मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी  विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला होता. जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून 1760 स्पर्धक सहभागी झाले होतेे. 

मंदार नामजोशी म्हणाले,’ अंक नाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल, हा उद्देश होता. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले होते. जिल्हा पातळी,  राज्य पातळीवर स्पर्धा घेतली . ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे पाठांतर स्पर्धा खुली होती. पुढील पाच वर्षे ही स्पर्धा राज्य पातळीवर घेतली जाईल, असे मंदार नामजोशी यांनी जाहीर केले.

Related Stories

विद्यार्थ्यांच्या केवळ ट्विटवरून ‘बेट’ व ‘गॅट बी’ परीक्षा स्थगित

triratna

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

datta jadhav

पुणे विभागात 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची आवक

pradnya p

विद्यापीठात आता भारतीय संस्कृती अभ्यासता येणार

pradnya p

पुणे विभागातील 64 हजार 468 रुग्ण कोरोनामुक्त

pradnya p

धनगर समाज शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

triratna
error: Content is protected !!