तरुण भारत

कर्नाटक परिवहन विभागाकडून ‘कार्गो’ सेवा सुरू

बेंगळूर/प्रतिनिधी

शुक्रवारपासून केएसआरटीसीसह इतर परिवहन महामंडळ मालवाहू सेवा सुरू करीत आहेत. विधानसौध येथे शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते ‘नम्मा कार्गो’ सेवांचे उद्घाटन झाले.

पहिल्यांदाच राज्य परिवहन विभाग पार्सल आणि मालवाहतुकीच्या क्षेत्रात काम करत आहे. राज्य मार्ग परिवहन बसस्थानकात बुकिंग काऊंटरवर ग्राहकांना त्यांचे पार्सल बुक करावे लागतील आणि सेवेसंदर्भात कोणतीही अडचण दूर करण्यासाठी विभागाने २४ तास कॉल सेंटर सुरू केले आहे. Www.nammacargo.in या संकेतस्थळावर ग्राहक कार्गो सेवा बुक करू शकतात.

पाच वर्षांसाठी स्ट्रॅटेजिक आऊटसोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेड हा व्यवसाय सुलभ होईल आणि परिवहन विभाग कंपनीला बसस्थानकांवर आपले पार्सल काउंटर बसविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत आहे, असे परिवहन मंत्री सवदी यांनी सांगितले.

Related Stories

बेंगळूर: डार्क वेबवर ड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी एकाला अटक

Shankar_P

कर्नाटकमध्ये बस पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड

Shankar_P

कर्नाटकात मंगळवारी ११८५ बाधितांची नोंद

Shankar_P

राज्यातील निजद नेत्यांमध्ये एकतेचा अभाव

Amit Kulkarni

वैद्यकीय महाविद्यालये 1 डिसेंबरपासून सुरू

Omkar B

बेंगळूर, शिमोगा, बळ्ळारीत प्रादेशिक लसीकरण केंद्रे

Omkar B
error: Content is protected !!