तरुण भारत

सातारा पालिकेचे 307 कोटींचे बजेट मंजूर

प्रतिनिधी / सातारा : 

सातारा पालिकेचे सन 2021-22 चे 307 कोटी 47 लाख 66 हजार 424 रुपयांचे बजेट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सभागृहात मांडले. बजेटमध्ये किल्ले अजिंक्यताऱ्याच्या विकासासाठी तसेच जुना राजवाडा येथे आर्ट गॅलरी विकसित करणे, अजिंक्यतारा स्मृती उद्यान नुतनीकरण आदी कामांसाठी तरतूद करण्यात आली.

तसेच कास धरणाची उंची वाढवणे, भुयारी गटर , घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजना आदी योजना पूर्णत्वास येवू लागल्या आहेत. कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे यांच्यासाठी तरतूद केली. तसेच हद्दवाढ झालेल्या शाहुपूरी, दरे खुर्दमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी तरतूद करण्यात आहे. 
पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा फरक, सानुग्रह अनुदान, कर्मचाऱ्यांना द्यावयाचे साहित्य, गणवेश वैद्यकीय प्रतीपूर्तीवरील खर्च 2021-22च्या अंदाजपत्रकांत तरतूद केली असल्याने सांगितले.

उत्पन्नाच्या बाबी पुढीलप्रमाणे, मालमत्ता कर 13 कोटी 75 लाख, पाणी कर 6 कोटी, विशेष स्वच्छता कर 1 कोटी 20 लाख, अग्निशमन कर 20 लाख, हद्दवाढ क्षेत्रातील महसूल 1 कोटी 75 लाख, इमारत भाडे व खुल्या जागा भाडे 1 कोटी 20 लाख, हातगाडा परवाना फी 26 लाख, नाटयगृह भाडे 10 लाख, विकास कर 3 कोटी, प्रिमीयम 2 कोटी, मंडई फी 9 लाख, महसूली अनुदाने 34 लाख, 43 हजार, भांडवली अनुदाने 122 कोटी 70 लाख 10 हजार अशी आहेत. तर खर्चाच्या बाबीमध्ये कर्मचारी वेतन व भत्ते 23 कोटी 23 लाख 65 हजार, निवृत्ती वेतन 15 कोटी 10 लाख, सातवा वेतन आयोग फरक 3 कोटी 25 लाख, कार्यालयीन व प्रशासकीय खर्च 8 कोटी 46 लाख 10 हजार, देखभाल दुरुस्ती 7 कोटी 98 लाख 10 हजार, शिक्षण मंडळ अंशदान 3 कोटी,

तसेच शासकीय कर्ज परतफेड 67 लाख, आरोग्य 7 कोटी 17 लाख, पाणी पुरवठा 3 कोटी 72, निवडणूक खर्च 1 कोटी 80 लाख, थोर व्यक्ती जयंती, वर्धापन दिन 40 लाख, पर्यावरण 5 लाख, दिव्यांग 39 लाख, मागासवर्गीय कल्याण 39 लाख, महिला व बालकल्याण निधी 39 लाख, भांडवली विकास कामे 202 कोटी, 78 लाख 8 हजार.  

Related Stories

जिल्हाधिकारी साहेब चौगुले मॅडमना सोशल डिस्टन्स शिकवा

Patil_p

कराडच्या सूनबाई इस्लामपुरात ऍक्शन मोडमध्ये

Omkar B

खटावच्या पूर्व भागाला तारळीच्या पाण्याची आस

triratna

आटकेतील युवकाच्या मृत्यूने तणाव

Patil_p

माजी विद्यार्थिनींकडून कन्या प्रशालेस डिजिटल क्लासरूम

Amit Kulkarni

लॉक डाऊन काळात पेट्रोल पंप चालकांची मनमानी शासनाचे नियम धाब्यावर

Patil_p
error: Content is protected !!