तरुण भारत

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ

ऑनलाईन टीम / पुणे : 


पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 4 हजार 883 सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती होस्टेल येथे करण्यात आला.


या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त् विक्रमकुमार,पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी आदी उपस्थित होते.


पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सदनिका प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तसेच पेठ क्रमांक 12 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहप्रकल्पातील निवासी सदनिका विक्रीच्या अटी व नियमांच्या माहिती पुस्तेकेचे प्रकाशन करण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अंतर्गत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. 


पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी येथीलपेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सदनिकांची योजनेच्या माध्यमातून गृहप्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या गृहप्रकल्पामध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शाळा, पोलीस चौकी, दुकाने, उद्याने, टपाल कार्यालय, बससेवा दवाखाना यासारख्या सर्व प्रकारच्या दैनदिनद नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत, या विकसित करण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील निवासी सदनिका विक्री करण्यासाठी इच्छुक व पात्र नागरिकाकडून अर्ज मागविण्याच्या येत आहेत. या नोंदणी प्रक्रियेला आज प्रारंभ करण्यात आला.

Related Stories

मराठा आरक्षणासाठी मागे हटणार नाही !

triratna

मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक

Shankar_P

मान्सून अंदमानात दाखल

Patil_p

शहरात १८, ग्रामीणमध्ये १७ नवे रुग्ण

triratna

‘मौज’ दिवाळी अंकाला सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार

pradnya p

समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्तदान करा : डॉ. नितीन करमळकर

pradnya p
error: Content is protected !!