हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक ज्वलंत उदाहरण
प्रतिनिधी / वाळवा
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुंजार चौकातील न्यू गणेश तरुण मंडळाच्या वतीने मशिदीमध्ये शिवजयंती साजरी करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक ज्वलंत उदाहरण निर्माण केले आहे. मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष सुभाष थोरात यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर सचिव राहुल कोकाटे यांचे हस्ते अमृतेश्वर हार्डवेअर मार्फत शिवाजी महाराजांचे तैलचित्र असलेले झेंडे व बिल्ले यांचे वाटप करण्यात आले. सांगली जिल्हयात हा उपक्रम आदर्श मानला जात आहे.
या उपक्रमासाठी विनायक पाटील, अर्जुन कोकाटे, प्रताप घारे, मधुकर पाटील, रामचंद्र घारे,पवन पाटील , बबलू शेजावळे, संदीप शिंगटे, निलेश शिंगटे, उदय थोरात,अशोक पाटील, दस्तगीर मुलानी व हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते कष्ट घेत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. गोटखिंडीचे सरपंच विजय लोंढे (सर), ग्रामसेवक डी. डी. कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


previous post