तरुण भारत

सांगली : वसंतरावदादा अभियांत्रिकीच्या “ऑटोमॅटिक पीनट शेलिंग मशीन”ला पेटंट प्राप्त

प्रतिनिधी/सांगली

बुधगाव (ता. मिरज) येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “ऑटोमॅटिक पीनट शेलिंग मशीन” या यंत्रास इंडियन पेटंट्स कार्यालयाकडून मान्यता मिळाली आहे. अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात इनोव्हेशन सेल चालू आहे. त्या अंतर्गत संशोधन कार्याची घोडदौड वेगाने चालू आहे. या यंत्राची संकल्पना गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्रा. पंकज आवटे यांनी मांडली.

आतापर्यंत कोणत्याही संशोधकाने अशाप्रकारचे यंत्र बनविले नसून हे अशाप्रकारचे पहिलेच यंत्र आहे. ज्यामुळे शेलिंगसाठी लागणार वेळ कमी होऊन शेलिंगची उत्पादकता सुधारण्यास मदत होणार आहे. या यंत्रामुळे वेळेची बचत होणार आहे. सोबतच हे यंत्र हाताळण्यास अत्यंत सुलभ असे आहे. विशेषतः महिला व वृद्ध व्यक्तींचे काम कमी करण्याबरोबरच उच्च कार्यक्षमता व उच्च उत्पादनक्षमता हे या यंत्राचे वैशिष्ट आहे.

या डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइन पेटंट मान्यता प्राप्त झाली आहे. याचा उपयोग व्यावसायिक व व्यापारी पद्धतीने करता येतो. हे यंत्र बनविण्यासाठी पी.ल. राजपूत, आदिनाथ मगदूम, प्रा. डॉ. डी. व्ही. घेवडे, डॉ. एन. एम. ढवळे, सी. जी. हारगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

सांगली : आटपाडीत आला दीड कोटींचा बकरा: कार्तिक पौर्णिमा जनावरांच्या बाजाराला प्रतिसाद

triratna

धनगर आरक्षण लढ्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून 10 लाखाची मदत

triratna

माधव नगर पाणी टाकीमुळे नागरिकांस धोका, ग्रामपंचायतीचे ही दुर्लक्ष

triratna

सांगली : बोरगावची श्री बलभीम यात्रा रद्द

triratna

संजयनगर येथे पन्नास हजाराची चोरी

triratna

सांगली जिल्हय़ात 875 कोरोनामुक्त तर नवे 936 रूग्ण

triratna
error: Content is protected !!