तरुण भारत

हिमाचल प्रदेश : धक्काबुक्की प्रकरण पाच आमदारांना भोवले

ऑनलाईन टीम / शिमला : 

हिमाचल प्रदेशात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना कॉंग्रेसच्या आमदारांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर राजभवनाकडे निघालेल्या राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचा रस्ता आडवून यांच्या गाडीसमोरही घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आमदारांना रोखण्यास गेलेल्या विधानसभा उपाध्यक्ष हंसराज यांना काँग्रेस आमदारांनी धक्काबुक्की केली.

या प्रकाराबद्दल संसदीय कामकाजमंत्री सुरेश भारद्वाज यांनी सभागृहात काँग्रेसचे आमदार मुकेश अग्निहोत्री, हर्षवर्धन चौहान, सतपालसिंह रायजादा, सुंदरसिंह ठाकूर आणि विनयकुमार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. विरोधकांच्या अनुपस्थितीत विधानसभा अध्यक्ष विपीन परमार यांनी हा प्रस्ताव मंजूर करत या 5 आमदारांना 20 मार्चपर्यंत निलंबित केले.

काय होते प्रकरण?

आज सकाळी 11 वाजता राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी अधिवेशनाच्या अभिभाषणाला सुरुवात केली. त्यानंतर 14 मिनिटांत काँग्रेस आमदारांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. राज्यपालांनी अभिभाषणातील 14 मुद्दे वाचले आणि 11.16 वाजता भाषण संपविले. राज्यपाल अभिभाषण संपवून राजभवनात जाऊ लागले. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या कौन्सिल चेंबरच्या गेटवर असलेल्या राज्यपालांच्या गाडीसमोर उभे राहून पुन्हा सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी वातावरण एवढे तापले की, विधानसभा उपाध्यक्ष हंसराज यांना मध्यस्ती करावी लागली. यावेळी हंसराज आणि काँग्रेस आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. 

Related Stories

एसबीआयकडून कर्ज व्याजदरांवर ‘ऑफर’

Patil_p

आंदोलनांसाठी सार्वजनिक जागांवर कब्जा अयोग्य

Omkar B

‘मास्टर’साठी कोरोनाकाळातही प्रचंड गर्दी

Patil_p

LOC वर भारतीय जवानांनी पाडले पाकिस्तानी क्वाडकॉप्टर

datta jadhav

दिल्ली : एकाच दिवसात 5 पोलिसांना कोरोनाची लागण

pradnya p

कन्हैयाने घेतली संजदच्या नेत्याची भेट

Patil_p
error: Content is protected !!