तरुण भारत

जम्मू काश्मीर : 85 नवे कोरोनाबाधित; तर 803 जणांवर उपचार सुरु

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 85 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 26 हजार 286 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 16 आणि काश्मीर मधील 69 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 803 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 101 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,23,527 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 51,049 रुग्ण जम्मूतील तर 72,478 जण काश्मीरमधील आहेत.  

तर आतापर्यंत 1956 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 725 जण तर काश्मीरमधील 1231 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 1.26 लाखांचा टप्पा

pradnya p

पंतप्रधानांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Amit Kulkarni

केंद्र शासित प्रदेशात एसएमएस सेवेस प्रारंभ

Patil_p

देशातील रुग्णसंख्या 28 हजारच्या पार

Patil_p

चर्चा असफल ठरल्यास लष्करी बळाचा पर्याय

Patil_p

बिहारमध्ये वीज तांडव; 83 जणांचा मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!