तरुण भारत

पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली /प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत पाच राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करत आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.

एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम असा
आसाम निवडणूक कार्यक्रम
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल.
पहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर १ एप्रिल आणि ६ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.


केरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा)
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे


पश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम ( एकूण २९४ जागा)
राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदानघेण्यात येणार आहे.

पहिला टप्पा २७ मार्च, दुसरा टप्पा १ एप्रिल, तिसरा टप्पा ६ एप्रिल, चौथा टप्पा १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा २२ एप्रिल, सातवा टप्पा २६ एप्रिल, आठवा टप्पा २९ एप्रिल
मतमोजणी – दोन मे

तामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम (२३४ जागा)
तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे


पुदुचेरी निवडणूक कार्यक्रम (३० जागा)
पुदुचेरीमध्ये ३० जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – ६ एप्रिल
मतमोजणी – २ मे


करोनाकाळात या निवडणुका होत असल्याने प्रचारासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे आखण्यात आली आहेत.
– दारोदार प्रचाराची उमेदवारासह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.
– रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
– संशयित कोविड रुग्णासाठी स्वतंत्र नियम असतील.
– निवडणूक अधिकार्‍यांचे लसीकरण झालेले असेल.

Related Stories

मोदी सरकारवर 50 टक्के चिनी संतुष्ट

Patil_p

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

prashant_c

जेईई आजपासून, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कायम

Patil_p

कोरोना काळात आता श्रद्धेचा बूस्टर डोस

Patil_p

डॉ. कफील खान यांच्या त्वरित सुटकेचे आदेश

Patil_p

क्वारंटाईन सेंटरमध्ये तबलिगींकडून उघड्यावर शौच, गुन्हा दाखल

prashant_c
error: Content is protected !!