तरुण भारत

ऑस्ट्रेलियाचा एब्डन उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ सिंगापूर

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिंगापूर खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वाईल्डकार्डधारक टेनिसपटू मॅथ्यू एब्डनने आपल्या देशाच्या द्वितीय मानांकित जॉन मिलमनचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Advertisements

गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात एब्डनने मिलमनवर 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये मात केली. एब्डनने हा सामना 72 मिनिटांत जिंकला. अन्य एका सामन्यात माल्डोवाच्या अल्बॉर्टने जर्मनीच्या हेफमनचा 6-7 (2-7), 7-6 (9-7), 6-3 तसेच दक्षिण कोरियाच्या केऊनने जपानच्या युचियामाचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

Related Stories

आयसीसीच्या बैठकीत आज विश्वचषकाचा निर्णय होणार

Patil_p

आरसीबीच्या पदरी अपयशाचा ‘वनवास’!

Patil_p

मल्ल सुमित मलिक दुसऱया चाचणीसाठी राजी

Patil_p

फिनिक्स झेप घेण्याचे चेन्नईसमोर आव्हान

Amit Kulkarni

अमेरिकन महिलांचे बास्केटबॉलमधील सलग सातवे सुवर्ण

Patil_p

विंडीज क्रिकेटपटूंना सध्या निम्मे वेतन देण्याचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!