तरुण भारत

संचारबंदीतही खेडमध्ये नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचा थाट

प्रतिनिधी/ खेड

जिल्हय़ात रात्रीची संचारबंदी जारी केली असतानाही खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने येथील गोळीबार मैदानात आयोजित राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेस गुरूवारी सायंकाळी प्रारंभ झाला. खुद्द चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाल्याने सारेच नागरिक अवाप् झाले.

Advertisements

  या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला, असे आयोजकांचे म्हणणे असले तरी कोरोना संसर्ग टाळण्याचे कितपत प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमधून होतील, या बाबतही जाणकारांमधून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात सलग चार दिवस या स्पर्धा हेणार आहेत. यामध्ये विजेत्यास 1 लाख 1 हजार 111 रूपये, उपविजेत्यास 51 हजार 111 रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे.

  याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे, मनविसेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश धारिया, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा टेनिस क्रिकेट असो.चे अध्यक्ष रहिम सहीबोले, मनसेचे तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले, शहर विकास आघाडीचे गटनेते भूषण चिखले, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजा जोयसर, चिपळूणचे नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, वैभवी खेडेकर, गौरी पुळेकर, मनविसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद शेटय़े, नंदू साळवी, ऋषीकेश कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

शिवसैनिकांना उदय सामंत यांच्या कानपिचक्या

Patil_p

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत सावंतवाडीची निधी बिले प्रथम

Ganeshprasad Gogate

‘तरुण भारत’ च्या पाठपुराव्याने शुक्रवारपासून चक्रीवादळ भागात सुरू होणार बस सेवा

Abhijeet Shinde

पाणी योजनेचा कोटय़वधीचा खर्च ‘पाण्यात’!

Patil_p

साताडर्य़ात लॉकडाऊनमध्ये वन्यप्राण्यांची शिकार

NIKHIL_N

गुहागरातील दारू अड्डय़ांवरील कारवाईने धंदेवाले धास्तावले!

Patil_p
error: Content is protected !!