तरुण भारत

वाळपई पालिकेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

भाजपाची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर

वाळपई / प्रतिनिधी

Advertisements

वाळपई नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या यादीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. सध्यातरी भाजपची यादी तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजित राणे परदेशात असल्यामुळे  बरीच संभ्रमित अवस्था निर्माण झाल्याचे चित्र कानावर येऊ लागले आहे. तरीसुद्धा त्यांच्या समर्थकांकडून भाजपाची यादी निश्चित करण्यासंदर्भात काम सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

 दरम्यान उमेदवारी दाखल करण्याच्या दुसऱया दिवशी एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यात प्रभाग क्रमांक 1 मधून एक तर प्रभाग क्रमांक 3 मधून 1 अर्जांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून मावळते नगरसेवक अनिल काटकर तर प्रभाग क्रमांक 3 मधून ओबीसी आरक्षितातून एकनाथ बोर्येकर यांनी निवडणूक अधिकारी सतरी तालुका उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्याकडे  उमेदवारी अर्ज सादर केला.

भाजपच्या उमेदवारी यादीकडे लक्ष

 प्रभाग 7 मधून सरफराज सय्यद तर प्रभाग क्रमांक 10 मधून मावळत्या नगरसेविका सेहझीन शेख यांना उमेदवारी मिळण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. तर प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, प्रभाग 3 हा ओबीसीसाठी आरक्षित घोषित केलेला आहे. यामुळे या भागातील उमेदवारांना संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या भागातील मतदारांनी आपल्याला उमेदवारी दाखल करण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. आयात उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही अशी मतदारांची मानसिकता असल्याचे बोर्येकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Related Stories

काँग्रेसच्यावतीने 16 रोजी महागाईच्या निषेधार्थ सायकल यात्रा

Patil_p

वास्कोतील कोरोना स्थितीचा पंचायतमंत्र्यांसमवेत बैठकीत आढावा

Patil_p

इंग्लंडची विमाने रद्द केल्याने गोव्याच्या पर्यटनावर परिणाम

Patil_p

म्हापसा श्री देव बोडगेश्वराचा 27 वा वर्धापनदिन उत्साहात

Patil_p

संजीवनीताई बोकील यांच्या अध्यक्षतेखाली 28 रोजी “ललित लेखन उपक्रम” ; कार्यक्रम गुगल मीटवर

Amit Kulkarni

बेळगावातून येणाऱया भाजीवर कठोर नजर ठेवण्याची गरज

Omkar B
error: Content is protected !!