तरुण भारत

आज बाल साहित्याचा जागर

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 20 वे मराठी बाल साहित्य संमेलन-मराठी भाषा दिन साजरा होणार

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी शनिवार दि. 27 रोजी 20 वे मराठी बाल साहित्य संमेलन व मराठी भाषा दिन संयुक्तपणे साजरा केला जाणार आहे. कवी कृ. ब. निकुंब साहित्यनगरी गोगटे रंगमंदिर येथे सकाळी 9.30 ते दुपारी 2 यावेळेत हे संमेलन होणार
आहे.

संमेलनाचे उद्घाटन बेळगावचे डॉ. केदार सामजी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत पोतदार उपस्थित राहणार आहेत. तर कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण अडत व्यापारी शंकरराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

पाहुण्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-

संमेलनाध्यक्ष-प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार

प्रा. डॉ. पोतदार हे कवी, साहित्यिक व वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘आई’ या विषयावर 300 हून अधिक कविता संग्रहित केल्या आहेत. तर या विषयावरील 118 कार्यक्रम सादर झाले आहेत. त्यांनी आजवर अनेक प्रकारचे ललित लेखन, समीक्षा लेखन, संपादन व काव्य लेखन केले आहे. त्यांना कोल्हापूर येथील युवा गौरव पुरस्कार, पुणे येथील प्रबोधन यात्री पुरस्कार, कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मंगळवेढा येथील बालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

उद्घाटक- डॉ.केदार सामजी

मूळचे हालगा येथील असणारे डॉ. केदार सामजी हे बालरोगतज्ञ आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी विद्यानिकेतन येथे झाले आहे. त्यांनी शेख मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी घेतली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठातून डी फार्मसी केली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन त्यांनी उत्तुंग यश मिळविले
आहे.

बक्षीस वितरक-शंकरराव पाटील

बेळगावमधील अडत व्यापारी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात शंकरराव पाटील अग्रेसर आहेत. मार्केटयार्ड येथील गुळाचा व्यापार सांभाळत त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी सामाजिक ट्रस्टची स्थापना करून शाळा-महाविद्यालये, ग्रंथालय, अनाथाश्रम, साहित्य संमेलनांना अर्थसाहाय्य केले आहे. अनेक शाळांना स्वच्छतागृहे, कपाटे, संगणक व शालेय उपयोगी साहित्य भेट दिले आहे. मराठा मंडळ संस्थेने किणये येथे त्यांच्या नावे शंकरराव पाटील पदवीपूर्व कॉलेज सुरू केले आहे.

Related Stories

व्ही. आर. देशपांडे मेमोरियल ट्रस्टतर्फे खानापुरात ‘डॉक्टर्स डे’ चे आयोजन

Omkar B

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

कचरा उचलण्याकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

एपीएमसी कंग्राळी खुर्द रस्त्याचे काम अपूर्णच

Amit Kulkarni

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

Amit Kulkarni

कर्नाटकच्या संभाव्य संघात सिद्धेश असलकरची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!