तरुण भारत

किणयेत शिवपुतळय़ाच्या चौथऱयाची स्लॅबभरणी

शिवपुतळा उभारणीच्या निर्णयाने युवकांत नवचैतन्य : लवकरच गावात पुतळय़ाची प्रतिष्ठापना

वार्ताहर / किणये

Advertisements

किणये गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची उभारणी करण्यात येणार आहे. या पुतळय़ाच्या चौथऱयाचा स्लॅबभरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक नारायण गुरव हे होते.

गणेशमूर्ती पूजन तुकाराम गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डुकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार असल्यामुळे शिवप्रेमींतून समाधान व्यक्त होत असून यानिमित्त गावकरी एकवटलेले
आहेत.

निवृत्त जवान संजय पाटील, वामन गडकरी, दयानंद डुकरे, वेंकट देसाई, अनिल डुकरे, पांडुरंग गुरव आदींसह ग्राम पंचायत सदस्य अप्पासाहेब कीर्तने या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हिरामणी मुचंडीकर हे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित मुचंडीकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी धर्मवीर संभाजी युवक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, महेश पाटील, विनायक पाटील, विष्णू सुतार, सातेरी गुरव, सयाजी पाटील, राहुल खामकर, अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक दळवी यांनी केले.

Related Stories

मतदारांचा वॉर्ड बदलल्याने उमेदवारांना धक्का

Amit Kulkarni

बेळगाव अधिवेशनात उत्तर कर्नाटक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar

लोकमान्य धनसंपदा आवर्ती ठेव ग्राहकांच्या सेवेत रुजू

Amit Kulkarni

विकासावरच ग्रामीण भागाचे भवितव्य अवलंबून

Omkar B

जिल्हा रुग्णालय आवारातील रस्त्यावर निसरड

Amit Kulkarni

बसस्थानकातून वातानुकूलित बससेवेला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!