तरुण भारत

रत्नागिरीतील नेवरे गावी फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप केली सुटका

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला होता. वनविभागाला याची खबर मिळताच त्याची फासकीतून सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला.

Advertisements


26 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे बिबट्या फासकीत अडकल्याची खबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भ्रमणध्वनी वरून परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी यांना 5.30 वाजताच्या दरम्यान दिली. परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी व स्टाफ नेवरे येथे जाउन खात्री केली. त्यावेळी पथकाला बिबट्या फसकीत अडकलेला दिसून आला. त्या बिबट्यास कटरच्या सहाय्याने फसकी तोडून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. बिबट्यास पिंजऱ्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचेकडून तपासणी करून घेतली. त्यानंतर त्या बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडले . सदरचे रेस्क्यू ऑपरेशन हे विभागीय वनअधिकारी रत्नागिरी दिपक पोपटराव खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीम. प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल पाली गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी श्रीम. मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले, सा. रं. पताडे यांनी पार पाडली.

Related Stories

मावळंगेत दोघांच्या मृत्यूनंतर तातडीने सर्वेक्षणाचे काम

Patil_p

चिपळुणात 26 लाखांचा गुटखा जप्त

Patil_p

रत्नागिरीतही दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 48 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांकडून शिवसेना आमदारांना शिवीगाळ

Abhijeet Shinde

‘लाचलुचपत’कडून वर्षभरात 13 लोकसेवकांवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!