तरुण भारत

कोल्हापूर विमानतळ अद्यावत करण्यासाठी कटीबद्द – पालकमंत्री

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग आदी विषयांबाबत पाहणी करून शनिवारी, पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेत्यांसह मान्यवरांची आढावा बैठक घेतली. गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकास कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग, संरक्षण भिंत, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीजपुरवठा आदी कामांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील नाईट लँडिंग बाबत नागरी उड्डाण संचानालय यांनी अडथळे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यापैकी काही अडथळे काढण्यात आले असून काहींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून नागरी उड्डाण संचानालय अधिकाऱ्यांसोबत दिल्लीला पुढील आठवड्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
विमानतळ बिल्डिंग कामामध्ये कोरोना संकटामुळे काही काळ व्यत्यय आला असल्याने हे काम आता येणाऱ्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्‍त ६४ एकर जागा संपादित केली जाणार आहे.

या भूसंपादनासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या भूसंपादनामुळे धावपट्टीचे विस्तारीकरण १३७० मी. वरून २३०० मीटरपर्यंत होणार आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या १५ दिवसांमध्ये पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सोबतच समर्पित ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे सुद्धा काम पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत सुमारे २ लाख १३ हजार प्रवाशांनी कोल्हापूर विमानतळावरून प्रवास केला आहे. कोल्हापूरमध्ये अद्यावत विमान सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आणि अजून जास्तीचे मार्ग लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यसाठी आम्ही सर्वचजण कटीबद्द असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यावेळी म्हणाले.

छ. राजाराम महाराज यांनी सुरु केलेल्या या कोल्हापूर विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आले आणि त्यांनी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभे राहण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

या बैठकीला, खा. संभाजीराजे छत्रपती, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, व्ही.बी.पाटील, तेज घाटगे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कोरोनाच्या रूग्णांसाठी `आप’ची हेल्पलाईन!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेईंग गेस्टनेच केली रोकड व दागिण्यांची चोरी

Abhijeet Shinde

राशिवडे येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

Abhijeet Shinde

`शेकाप’ जिल्हा बँकेच्या आखाड्यात

Abhijeet Shinde

नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण बैठक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हुपरीच्या चांदी उद्योजकाची स्‍वत: वर गोळी झाडून आत्‍महत्‍या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!