तरुण भारत

पुणे विभागातील 5 लाख 87 हजार 121 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 87 हजार 121 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 14 हजार 969 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 11 हजार 532 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 311 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

Advertisements

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 4 हजार 948 रुग्णांपैकी 3 लाख 86 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 9 हजार 313 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.45 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 लाख 24 हजार 711 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 14 हजार 969 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी सर्वपक्षीय प्रतिनिधी संभाजीराजेंच्या निवासस्थानी

Abhijeet Shinde

कोरोनातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना; सुप्रिया सुळेंची घोषणा

Abhijeet Shinde

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे ब्रीच कँडीत

Abhijeet Shinde

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा हजारी पार

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 1 लाख पेक्षा अधिक रुग्ण कारोनामुक्त : सौरभ राव

Rohan_P

आता घरबसल्या करु शकता वाहन नोंदणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!