तरुण भारत

बेळगावात घरफोडय़ा करणाऱया जोडगोळीला अटक

यमकनमर्डी पोलिसांची कारवाई : 18 लाखांचा ऐवज जप्त : कोल्हापूरच्या रहिवाशाचा समावेश

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व उपनगरांमध्ये चोऱया व घरफोडय़ा करणाऱया एका जोडगोळीला यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 18 लाख 59 हजार 776 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर येथील एका आंतरराज्य गुन्हेगाराचा समावेश आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. संतोष गंगाराम वड्डर (वय 46, रा. अरभावी, ता. गोकाक) व त्याचा साथीदार विशाल नरसिंग शेरखाने (वय 50, रा. जवाहरनगर, बिजली चौक, बी- वॉर्ड, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. विशालला शुक्रवारी तर संतोषला यापूर्वीच अटक झाली आहे.

यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, हवालदार बी. व्ही. नेरली, विठ्ठल नायक, एल. वाय. किलारगी, महेश करगुप्पी, आर. आर. गिडप्पगोळ, एस. ए. शेख, मैलार बेन्नी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. 19 फेब्रुवारी रोजी जिनराळ क्रॉसजवळ संतोष वड्डरला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी विशाल शेरखाने याला पोलिसांनी अटक केली आहे.

या जोडगोळीने कित्तूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2, मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2 घरफोडय़ा व एका मंदिरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तर 5 घरफोडय़ा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. गोकाक शहरात 1 व पाच्छापूर येथे 1 घरफोडी केली असून एकूण 12 चोरी प्रकरणांचा तपास लागला आहे.

पोलिसांनी 361.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 785 ग्रॅम चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरलेली एम. एच. 09 एबी 5845 क्रमांकाची मारुती अल्टो कार जप्त केली आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या विशाल शेरखाने याला हुक्केरी येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अट्टल घरफोडय़ांना अटक करणाऱया पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.

 कोल्हापुरात दागिन्यांची विक्री चोरीच्या दागिन्यांची विक्री कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. संभाजीनगर, कोल्हापूर येथील गिरीश चंद्रकांत पोतदार या सराफाकडे दागिन्यांची विक्री केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून यापूर्वीच सराफालाही अटक करण्यात आली होती.

Related Stories

हिडकल येथील रेकॉर्डरुम बेळगावला हलवावे

Omkar B

बाप्पा चालले आपुल्या गावाला!

Amit Kulkarni

बिग बॉस फेम सई लोकुर विवाहबद्ध

Patil_p

मराठीच्या अस्मितेसाठी पुन्हा एकीचा प्रयत्न करा

Omkar B

बससेवा सुरळीत पण प्रवाशांचा अभाव

Patil_p

बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना डोकेदुखीचीच

Amit Kulkarni
error: Content is protected !!