तरुण भारत

होनकुप्पी, हत्तरवाट येथे स्फोटके जप्त

जिल्हा पोलिसांची कारवाई : 158 जिलेटिन कांडय़ा जप्त ; हत्तरवाट, ता. चिकोडी येथील स्फोटके केली निकामी : पाच अटक

 प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

राज्यातील दोन वेगवेगळ्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा स्फोटके साठविणाऱयांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. गोकाक तालुक्मयातील होनकुप्पी येथे जिलेटिनच्या कांडय़ा व ईडी केबल जप्त करण्यात आली असून हत्तरवाट (ता. चिकोडी) येथे विहीर खोदण्यासाठी बेकायदा स्फोट घडविणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे. होनकुप्पी येथील भीमाप्पा बसाप्पा हेगडे यांच्या शेतजमिनीत 158 जिलेटिनच्या कांडय़ा, 51 ईडी केबल, ब्लास्टिंग चार्जर बॅटरी व एक ट्रक्टर जप्त करुन त्यांच्यावर कुलगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गोपाल बसप्रभू सोरगांवी, गिरीमल्लप्पा बसाप्पा सिद्धापूर (दोघेही रा. गोलभांवी, ता. रबकवी-बनहट्टी), राजेश मोनाप्पा बडीगेर (रा. बबलेश्वर), भीमाप्पा बसाप्पा हेगडे (रा. होनकुप्पी) या चौघा जणांवर बेकायदा स्फोटके साठविल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजेश बडीगेर हा फरारी असून उर्वरित तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

दुसरी कारवाई चिकोडी तालुक्मयातील हत्तरवाट येथे शुक्रवारी करण्यात आली आहे. कल्लाप्पा निंगाप्पा सुजी (रा. निडसोशी) यांच्या मालकीच्या शेतजमिनीत विहीर खोदाई सुरू आहे.

 या विहिरीसाठी बेकायदा स्फोट घडविणाऱया शांतीलाल गणेश दुग्गर (रा. घटप्रभा), त्यागराज सोमू राठोड (रा. बसवण बागेवाडी) या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिलेटिन व डिटोनेटरच्या साहाय्याने स्फोट करण्यात आला आहे. चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.  

Related Stories

जागनूर येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खून

Patil_p

पत्रकारितेचे आयाम पूर्णतः बदलले

tarunbharat

पोलीस-आरटीओकडून होणारा त्रास थांबवा

Patil_p

मंथन सोसायटीतर्फे 2 रोजी ‘मधुरभेट’ कार्यक्रम

Patil_p

पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार

Patil_p

विनामास्क प्रकरणी मनपाची कारवाई बंद

Patil_p
error: Content is protected !!