तरुण भारत

रिवे सत्तरी याठिकाणी बेकादेशीररित्या झाडांची कत्तल. गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मालकाची मागणी.

वाळपई / प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील रिवे  गावांमध्ये सर्वे क्रमांक 2/3 या जमिनीमधील आपल्या मालकीची मोठय़ा प्रमाणात झाडे कापण्यात आली असून यामुळे पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणात हानी झालेली आहे. यामुळे संबंधित नागरिकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जमिनीचे मालक  हरिचंद्र फटी गावकर यांनी केले आहे  अन्यथा आपण या संदर्भात न्यायालयात दाद मागणार असून त्वरित कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे  .

Advertisements

याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रातील रिवे या ठिकाणी सर्वे क्रमांक 2/3 या क्षेत्रात जवळपास पंचवीस हजार चौरस मीटर आपल्या मालकीची जमीन आहे. या जमिनीमध्ये सदर भागातील रहिवासी महादेव बैलुडकर यांनी बेकायदेशीररित्या आंबा काजू व रानटी झाडांची बेकायदेशीर कत्तल केलेली आहे.. यासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपल्याला कोणत्या प्रकारची सहकार्य केले नाही. उलटर्थी बेकायदेशीर पद्धतीने मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की सदर भागातील झाडे कापून त्याठिकाणी आग लावून निसर्गाची मोठय़ा प्रमाणात हानी केलेली आहे. यामुळे येणाऱया काळात सदर भागांमध्ये नैसर्गिक पद्धतीने झाडे उडविण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे .

याबाबतची तक्रार आपण वाळपई वनखाते व वनखात्याचे उपवनपालकांकडे केलेली आहे .त्यांनी यासंदर्भात महादेव बैलुडकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की या संदर्भात आपण अधिकाऱयांशी चर्चा केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे. मात्र शक्मय तेवढय़ा लवकर या संदर्भात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी हरिश्चंद्र फटी गावकर यांनी केलेली आहे. वनखात्याच्या यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे हरिचंद्र गावकर यांनी स्पष्ट केलेले आहे. कारण आपली मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे .त्याचप्रमाणे निसर्गाची कोणत्याहघ प्रकारची काळजी न घेता मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल करून त्याठिकाणी आग लावून निसर्गाची नुकसानी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे हरिचंद्र गावकर यांनी स्पष्ट केलेले आहे.

Related Stories

प्रभाग 22 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दामोदर नाईक यांचा दावा

Amit Kulkarni

पं.वसंतराव गाडगीळ यांना शृंगेरी पीठाचा सन्मान

Amit Kulkarni

गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात

Omkar B

केपे नगराध्यक्षपदी सुचिता शिरवईकर

Amit Kulkarni

संसर्गजन्य रोगाच्या निर्मूलनासाठी जागरूकता महत्त्वाची-पिल्लई

Amit Kulkarni

लसीकरणाचा दावा म्हणजे सरकारचा खोटारडेपणाच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!