तरुण भारत

गोवा फॉरवर्ड हाच फोंडय़ासाठी सक्षम पर्याय

आमदार विजय सरदेसाई यांचे उद्गार : पक्षाच्या फोंडा कार्यालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

फोंडा मतदार संघाच्या विकासासाठी येथे नेतृत्त्व बदल होण्याची नितांत गरज आहे. गोवा फॉरवर्डच हा सक्षम पर्याय देऊ शकेल. नगरसेवक व्यंकटेश नाईक हे येणाऱया विधानसभा निवडणुकीतील गोवा फॉरवर्डचे अधिकृत उमेदवार असून फोंडय़ाला सक्षम नेतृत्त्व देण्याची त्यांच्यात धडाडी आहे, असे उद्गार पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काढले.

गोवा फॉडवर्डने व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांना फोंडा मतदार संघात अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर सुरु केलेल्या संपर्क कार्यालयाचे शनिवारी तिस्क फोंडा येथे उद्घाटन झाले. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळय़ात विजय सरदेसाई बोलत होते. पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, साळगावचे आमदार जयेश साळगावकर, पक्षाचे पदाधिकारी अकबर मुल्ला, दुर्गादास कामत, मोहनदास लोलयेंकर, दिलीप प्रभूदेसाई, व्यंकटेश नाईक, नगरसेविका चंद्रकला नाईक, जॉन नाझारेथ व अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

फोंडा हे मंदिरांचे केंद्र असून पर्यटनीयदृष्टय़ा या क्षेत्राचा योग्यप्रकारे विकास झालेला नाही. येत्या निवडणुकीत फोंडय़ातील मतदारांनी गोवा फॉरवर्डला संधी दिल्यास फोंडय़ाचा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याचे आवाहन विजय सरदेसाई यांनी केले. भाजप सरकारच्या धोरणांवर त्यांनी यावेळी जोरदार टिका केली. फोंडा भाजपा हा प्रायव्हेट लिमिडेट पक्ष झाला असून तो ठराविक व्यक्तींनाच उमेदवारी देत आला आहे. येथील स्थानिक आमदारही फोंडय़ातील एकाही प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवित नाहीत. फोंडय़ाच्या राजकीय औषधाची वैधता संपुष्टात आली असून आता व्यंकटेश नाईकसारख्या जालीम लसीचीच गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.

आमदार विनोद पालयेंकर म्हणाले, गोवा फॉरवर्ड हाच गोवा व गोमंतकीयांना खऱया अर्थाने न्याय देऊ शकणारा पक्ष आहे. गोंयकारपण टिकून राहण्यासाठी यापुढे येथील मतदारांना पर्याय म्हणून या पक्षाकडे पाहावे लागेल. आमदार जयेश साळगावकर यांनी, आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात फोंडय़ात बरीच विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले. व्यंकटेश नाईक हा फोंडय़ातील जनतेच्या प्रश्नांबद्दल तळमळ असलेला उमेदवार गोवा फॉरवर्डने दिलेला आहे. त्यांना विधानसभेवर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहनदास लोलयेंकर म्हणाले, गोवा फॉरवर्डचा प्रभाव गोव्यात वाढत असून पेडणे ते काणकोणपर्यंत पक्षकार्याचा विस्तार करणार आहे. भाजपाला पक्ष टक्कर देण्याची क्षमता या एकाच पक्षात आहे. नोकरभरती ही भाजपाची घोषणा निव्वळ आमिष असून त्याला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आजवर भाजपामध्ये आपण सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेसाठी प्रामाणिकपणे कार्य केले. मात्र त्यांनी नेतृत्त्वाबाबत आपला कधीच विचार केला नाही. गोवा फॉरवर्डने ती संधी दिलेला आहे. फोंडय़ाच्या विकासासाठी आपण तिचा पुरेपूर वापर करण्याचे आश्वासन व्यंकटेश नाईक यांनी दिले. अकबर मुल्ला यांनी स्वागत केले. प्रशांत नाईक यांनी सूत्रसंचालन तर चंद्रकला नाईक यांनी आभार मानले.

Related Stories

‘मतदार राजा’ आज बजावणार हक्क

Amit Kulkarni

कोरोना बळींची संख्या 17 वर

Omkar B

रेल्वे दुपदरीकरण करताना दूधसागर पर्यटनाचा विचार व्हावा

Patil_p

मडगावातील बाजारपेठांच्या निर्जंतुकीकरणाला प्राधान्याची गरज

Patil_p

अंगणवाडी सेविकांचे दोन गट

Amit Kulkarni

प्रो. लीग फुटबॉलमध्ये वास्कोचा वेळसाववर 3-2 गोलांनी विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!