तरुण भारत

इच्छुक, मावळत्या नगरसेवकांकडून मतदारांची कामे करून देण्याचे सत्र

प्रतिनिधी / मडगाव

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी तसेच मावळत्या नगरसेवकांनी आपल्या मतदारांची कामे स्वखर्चाने करण्यात कोणतीही कसर सोडलेली नसून प्रभाग 22 चे मावळते नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांनी यंदा प्रभाग 5 मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रभाग 22 मधील साफसफाई व अन्य कामे स्वखर्चाने करण्याचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले आहे. नुकतीच त्यांनी या प्रभागात साफसफाई करताना स्वतःचे कामगार व साहित्य वापरून उचलही केली.             

Advertisements

आपण प्रभाग 5 मधून यंदा पालिका निवडणुकीत उतरणार असलो, तरी म‍ावळते नगरसेवक म्हणून प्रभाग 22 मधील कामे करणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. य‍ा प्रभागाला नवीन नगरसेवक मिळेपर्यंत आपण या प्रभागातील कामे करत राहणार असून येथील रहिवाशांनी त्यासाठी आपणाशी संपर्क करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग 22 मधून माजी मंत्री बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक भाजप पुरस्कृत पॅनलमधून निवडणूक लढविणार आहेत.

मडगाव पालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन प्रचार करणाऱया इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मतदार साफसफाई व अन्य कामे झाली नसल्याच्या तक्रारी पुढे करत असल्याने काही इच्छुकांनी स्वतःचे कामगार व यंत्रसामग्री वापरून अशी कामे करून देण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. प्रभाग 5 मधून भाजप पुरस्कृत गटातून निवडणूक लढविणार असलेले माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांच्याकडे झाडेझुडपे तसेच गटारांची साफसफाई झाली नसल्याची तक्रार मुरिडावासियांकडून आल्यानंतर पेशाने कंत्राटदार असलेल्या डिसिल्वा यांनी आठवडाभरापूर्वी आपले जेसीबी, रोड रोलर व अन्य सामग्री तसेच कामगार वापरून झाडेझुडपे व फांद्या छाटल्या. तसेच भू-गटार वाहिन्या टाकल्यामुळे खराब झालेले रस्ते रोड रोलर वापरून सपाट करताना त्यावर हॉटमिक्सचा थर घालून दिला.

डिसिल्वा प्रभाग 22 मध्ये स्वखर्चाने साफसफाई व अन्य कामे करताना आढळल्याने ते पुन्हा याच प्रभागातून निवडणूक लढविणार की काय याबद्दल चर्चा सुरू झाली होती. पक्ष काय तो निर्णय घेणार असे त्यावर बोलताना डिसिल्वा यांनी स्पष्ट केले होते. मात्र भाजपने आपले उमेदवार शुक्रवारी जाहीर केल्यानंतर चित्र स्पष्ट झाले असून त्यानुसार डिसिल्वा प्रभाग 5 मधूनच निवडणूक लढविणार आहेत.

Related Stories

चित्रपट निर्मितीसाठी गोवा सर्वाधिक पसंतीचे स्थळ बनविणार

tarunbharat

म्हाऊस देवस्थानचा पारंपरिक घोडेमोडणी उत्सव

Amit Kulkarni

स्वयंपूर्ण गोवा कामाला सत्तरी तालुक्यातून प्रारंभ

Patil_p

लोकायुक्त व माहिती आयुक्तांची नेमणूक करावी

Patil_p

दाबोळीच्या प्रेमानंद नाणोस्कर यांचा आप मध्ये प्रवेश

Amit Kulkarni

आय-लीगमध्ये आज चर्चिल ब्रदर्सचा मुकाबला पंजाब क्लबशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!