तरुण भारत

खासगी रुग्णालयात २५० रुपयात मिळणार लस

नवी दिल्ली/प्रतिनिधी

देशात लसीकरणाचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मार्च पासून सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. काही मार्गदर्शक नियमावलीही जारी करण्यात आली आहे.

दरम्यान खासगी रुग्णालयांतूनही करोना लस देण्यात येणार असून तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, तर सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले. लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून (१ मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, पक्षाघात, दहा वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्चरक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी २० प्रकारच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल.

आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यानंतर आता सोमवारपासून तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती आणि ४५ वर्षांहून अधिक वयाच्या सहआजार रुग्णांना लस दिली जाईल. एकूण १० हजार सरकारी सुविधा व २० हजार खासगी रुग्णालये त्यासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी असे लसीकरणाचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात सोमवारपासून वृद्ध तसेच सहआजाराच्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात लस मोफत दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये लस सशुल्क असेल, असे केंद्रीय आरोग्य राजेश भूषण यांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या दूरसंवाद बैठकीत स्पष्ट केले होते.

खासगी रुग्णालयांत प्रत्येक लसमात्रेसाठी २५० रुपये आकारले जातील. करोना प्रतिबंधासाठी लसीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने हा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येक मात्रेसाठी जे २५० रुपये आकारले जाणार आहेत, त्यात १५० रुपये लसीचे आणि १०० रुपये सेवा सुल्क आहे. लसीकरणासाठी निवडलेल्या खासगी रुग्णालयांची यादी केंद्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

सरकारने आतापर्यंत खासगी रुग्णालयांतून दिल्या जाणाऱ्या लसीची किंमत निश्चित केली नव्हती. आता ती केली असली तरी पुढील सूचना मिळेपर्यंत लशीची किंमत बदलू शकते, असे सांगण्यात आले. खासगी संस्थांना सरकारी रुग्णालयातूनच लसपुरवठा केला जाणार आहे. सरकारने सरकारी रुग्णालयांतून लस मोफत देण्याचे ठरवले आहे.

Advertisements

Related Stories

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

किरकोळ तरीही पुन्हा इंधन दरवाढ

Patil_p

अमेरिकेत सत्तांतर, चीनची 28 जणांवर बंदी

Amit Kulkarni

गुजरातमध्ये राजधानी एक्सप्रेस उलटविण्याचा प्रयत्न फसला

datta jadhav

उत्तर भारतात संततधार सुरूच

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.36 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!