तरुण भारत

ब्राझीलमध्ये कोरोनाने घेतले 2.5 लाख बळी

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये 1 कोटी 05 लाख 17 हजार 232 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 54 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

शनिवारी ब्राझीलमध्ये 59 हजार 438 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1275 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 1.05 कोटी बाधितांपैकी 93 लाख 86 हजार 340 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 लाख 76 हजार 529 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या देशात आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Related Stories

सौदीतील महिलांना तिन्ही सैन्यदलाची दारे खुली

datta jadhav

टोळधाडीच्या विरोधात भारत-पाकची संयुक्त मोहीम

Patil_p

मानलं बुवा या मुलीला अस्वलासोबत जाते मासेमारीला

Amit Kulkarni

देवसहायम पिल्लई यांना मिळणार ख्रिश्चन संतपद

Omkar B

‘सुवर्ण’स्वप्न भंगले; आता कांस्य पदकाची आशा

datta jadhav

ColdZyme 20 मिनिटांत करणार 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट

datta jadhav
error: Content is protected !!