तरुण भारत

खेड पोलिसांकडून अडकलेल्या दोन ट्रेकर्सची सुखरूप सुटका

प्रतिनिधी / खेड

खेड तालुक्यातील किल्ले सुमारगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेले दोन ट्रेकर्स जंगलात अडकून पडले होते. ही बाब येथील पोलिसांना कळल्यानंतर तातडीने पोलीस फौज फाटा रवाना करून दोघांचीही सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
राजकुमार परबती जाधव, ओंकार परबती जाधव अशी दोन ट्रेकर्सची नावे आहेत. हे दोघेजण शनिवारी सकाळच्या सुमारास किल्ले सुमारगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. दुचाकी वाडीबेलदार येथे पार्क केली होती. ट्रेकिंग करत असताना अचानक वाट चुकल्याने ते एका डोंगरात अडकले.

याबाबत तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याशी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी क्षणाचाही विलंब न लावता सायंकाळी ४ वाजता आंबवली बीट अंमलदार व सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र बुरटे, पोलीस कॉ. नितीन चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले. पोलीस पाटील भार्गव चव्हाण, माजी सरपंच पांडुरंग शिंदे, विकास शिंदे यांच्या मदतीने दोघांचा शोध घेत दोन्ही ट्रेकर्सना वाडीजैतापूर येथे सुखरूप आणले.

Advertisements

Related Stories

‘रेडिओ म्युझिक मिरची’वर प्रीतेश-मीतेशची छाप

NIKHIL_N

आरोंदा येथील रहिवासी निर्मला नाईक यांचे निधन

Ganeshprasad Gogate

उद्योजक सुरेश तावडे यांच्याकडून रवळनाथ मंदिरला ३५ केव्हिचा जनरेटर

NIKHIL_N

राजापुरातील कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर

Abhijeet Shinde

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस बंद

Abhijeet Shinde

घरपोच मद्य विक्री आदेश घेतला चार तासातच मागे

Patil_p
error: Content is protected !!