तरुण भारत

कोल्हापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 33 नवे रूग्ण

जिल्ह्यात 44 रूग्ण, 5 कोरोनामुक्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यात रविवारी शहरात कोरोनाने शहरातील राजारामपुरी सातव्या गल्लीतील 86 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात 44 नवे रूग्ण दिसून आले. त्यातील 33 शहरातील आहेत. त्यामुळे सक्रीय रूग्णसंख्या 293 झाली आहे. दिवसभरात 5 जण कोरोनामुक्त झाले तर 258 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

शहरात रविवारी कोरोनाने वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 744 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 851, नगर पालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 386 व अन्य 158 आहेत. दिवसभरात 5 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 400 झाली आहे.

रविवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 1, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 4, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहरात 33 तर अन्य 1 जणांचा समावेश आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 1667 रिपोर्ट आले. त्यापैकी 1611 निगेटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 109 रिपोर्ट आले. त्यापैकी 108 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 256 रिपोर्ट आले. त्यापैकी 229 निगेटिव्ह आहेत,. अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

सक्रीय रूग्णसंख्या तीनशेकडे
कोरोना रूग्ण ः 44 एकूण ः 50437
कोरोनामुक्त 5 ः एकूण ः 48400
कोरोना मृत्यू ः 1 एकूण मृत्यू ः 1744
सक्रीय रूग्ण 293 ः 24 तासांत 258 जणांची तपासणी

Related Stories

संस्कृत दिनानिमित्त लघुचित्रपट उत्सव

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शाळांना प्रचलित धोरण लागू करा अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगावने उमदा बॉक्सिंगपट्टू गमावला

Abhijeet Shinde

कोडोलीत लोकमान्यचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

Abhijeet Shinde

मोटारचा शॉक लागून शिरोळ येथील एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवबंधनात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!