तरुण भारत

राज्यातील 1054 केंद्रांवर एफडीएची परीक्षा सुरळीत

बेंगळूर : कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये राज्यातील सुमारे 1054 केंद्रांवर केपीएससी एफडीएची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. 1253 पदांसाठी 24 जानेवारीला सदर परीक्षा होणार होती. मात्र, त्यावेळी प्रश्नपत्रिका फुटल्याने एफडीएची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. दरम्यान, यावेळेस प्रश्नपत्रिका फुटणार नाही, याची सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली होती. परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका पाठविण्यासाठी तीन टप्प्यातील सुरक्षा पुरविण्यात आली होती. प्रश्नपत्रिका पुरविणाऱया वाहनांना जीपीएस बसवून पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिका पुरविण्याची खबरदारी कर्नाटक लोकसेवा आयोगाने घेतली होती. सुमारे 3.57 लाख जणांनी एफडीए पदांसाठी अर्ज केला होता. पहिल्या टप्प्यात परीक्षा रद्द झाल्यानंतर दुसऱया टप्प्यातील परीक्षेसाठी अडीच लाखांपेक्षा अधिक परीक्षार्थींनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते. सीसीटीव्हीची देखरेख आणि पोलीस खात्याच्या नेतृत्त्वाखाली रविवारी 1054 केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली.

Related Stories

बेंगळूर : वाहतूक पोलिसांकडून २.१४ कोटी दंड वसूल

triratna

बेंगळूर: आयआयएससीला जगातील अव्वल संशोधन विद्यापीठात स्थान, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंद

triratna

माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सशर्त जामीन

Amit Kulkarni

पदवी, अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वायत्तता

Omkar B

बेंगळूरमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता दहा पट वाढविणार

Amit Kulkarni

दहावी परीक्षेचा निकाल लांबणीवर

triratna
error: Content is protected !!