तरुण भारत

खून महाराष्ट्रात अन् विल्हेवाट कर्नाटकात

मृत पट्टणकोडोली येथील : घटनेतील दोघांकडून खुनाची कबुली :  हुपरी पोलिसांकडून खुनाचा उलगडा

वार्ताहर / कोगनोळी

Advertisements

येथील कोगनोळी-हंचिनाळ रस्त्यावरील कोंढारमळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओढय़ाच्या पात्रामध्ये बंद पेटीत मृतदेह आढळून आला. खून करून मृतदेह येथे टाकून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर मृत स्क्रॅप गोळा करणारा असून मोहम्मद बंडू जमादार (वय 50, रा. तळंदगे फाटा, रत्नपार्वती नगर, पट्टणकोडोली) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हुपरी पोलिसांनी संशयित आरोपींना कोगनोळी येथे आणून जागेची शहानिशा केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

याबाबत हुपरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मोहम्मद बंडू जमादार (वय 50, रा. तळंदगे फाटा, रत्नपार्वती नगर, पट्टणकोडोली) हा स्क्रॅपचा व्यवसाय करत होता. तो 26 फेब्रुवारीपासून गायब असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने हुपरी पोलीस स्थानकात दिली होती. तक्रारीनुसार तपास यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर संशयावरून दोघांना एलसीबी कोल्हापूर यांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी सायंकाळी त्यांच्याकडे कसून चौकशी करून सदर संशयितांना हुपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यावेळी संशयितांनी आपणच मोहम्मद याचा खून करून मृतदेह कोगनोळी येथे असणाऱया गावाच्या पूर्वेकडील ओढय़ात टाकले असल्याची कबुली दिली होती.

त्यानुसार रविवारी सकाळी सदर संशयित आरोपींना कोगनोळी येथील कोंढारमळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओढय़ावरती आणून पत्र्याची पेटी टाकलेल्या ठिकाणाची माहिती प्राप्त करून घेतली. त्या माहितीनुसार सदर ओढय़ामध्ये पत्र्याची पेटी निदर्शनास आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हुपरी पोलीस ठाण्याचे फौजदार राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पेटी ओढय़ातून बाहेर काढण्यात आली. कुलूप असलेल्या पेटीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर नातेवाईकांना त्याची ओळख पटवून देण्यात आली. ओळख पटल्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह हुपरी येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी दिली. कोगनोळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी. एम. घस्ती यांनी मदत
केली. कोगनोळी येथे मृतदेह टाकलेल्या ठिकाणी हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रकाश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक कोळी, सचिन सावंत, दीपक कांबळे, चव्हाण, जमादार आदी उपस्थित होते. घटनास्थळी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी हुपरी पोलिसांसोबत चर्चा केली. सदर खुनाचे अद्याप कारण समजू शकलेले नसून याप्रकरणी हुपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

कोरोना महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान द्या !

Rohan_P

फायनान्स धारकांकडून होणारा त्रास थांबवा

Patil_p

बेळगावात कर्नाटक बंदचा उडाला फज्जा

Patil_p

स्वदेशी जागरण मंचतर्फे विश्वजागरण दिन

Patil_p

हुबळीत पोलिसांवर दगडफेक

Patil_p

विद्यार्थ्यांच्या रास्ता रोकोमुळे एकच गोंधळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!