तरुण भारत

स्वच्छता कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवृत्त स्वच्छता कामगारांची निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

निवृत्त स्वच्छता कर्मचाऱयांसाठी तसेच निवृत्त कर्मचाऱयांसाठी विविध योजना व लाभांची घोषणा करण्यात येते. मात्र कॅन्टोन्मेंट कार्यालयातील निवृत्त अधिकारी-कर्मचाऱयांना आणि स्वच्छता कामगारांना याचा लाभ मिळत नाही. सहावे आणि सातवे वेतन आयोग देण्यात आले नाही. त्यामुळे सदर वेतन देण्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन संघटनेच्यावतीने  संरक्षणमंत्री रामनाथसिंह यांना पाठविण्यात आले. कॅन्टोन्मेंटमधील निवृत्त कर्मचाऱयांना सहाव्या वेतन आयोगप्रमाणे निवृत्ती वेतन देण्यात यावे, असा आदेश करण्यात आला होता. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पण काही निवृत्त स्वच्छता कर्मचाऱयांना अद्यापही याचा लाभ झाला नाही.

कॅन्टोन्मेंटमध्ये काम करणारे स्वच्छता कामगार गरजू असल्याने त्यांना सर्व लाभ मिळणे आवश्यक आहे. पण काही स्वच्छता कर्मचारी मयत झाले तरी शासनाकडून मिळणारे लाभ देण्यात आले नाहीत. केंद्र शासनाच्या आदेशानुसार व निवृत्त स्वच्छत कर्मचाऱयांच्या हक्कानुसार सर्व लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून राबविण्यात येणारी योजना आणि लाभ निवृत्त स्वच्छता कामगारांना देण्यात यावेत.

स्वच्छता कामगारांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये काम केलेल्या निवृत्त कर्मचाऱयांना सर्व लाभ देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डला सूचना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन संघटनेचे राज्याध्यक्ष काशिराम चौहाण, उपाध्यक्ष डॉ. मदन डोंगरे, जिल्हा अध्यक्ष मुरली चव्हाण, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, सहसचिव विवेक घटकांबळे, कार्यकारी सचिव संजय भंडारे, जनरल सेपेटरी निरज बनसकर, कोंडय्या दुड्डू, पी. एल. रजपूत आदींच्या सहीनिशी रक्षा मंत्रालयाला पाठविण्यात आले आहे.

Related Stories

‘त्या’ सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई करा

Amit Kulkarni

सौहार्द सहकारी सोसायटय़ांवर नियंत्रणासाठी टास्कफोर्स कमिटी

Patil_p

कर्नाटक : साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महेश जोशी आघाडीवर

Sumit Tambekar

लॉकडाऊनसंदर्भात जिल्हाधिकाऱयांचा आदेश

Amit Kulkarni

चापगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद

Amit Kulkarni

शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नावे नोंदवा

Patil_p
error: Content is protected !!