तरुण भारत

सरकारी जागेत बेकायदेशीर बांधकाम

प्रतिनिधी / बेळगाव

अनगोळ येथील सरकारी खुल्या जागेत बेकायदेशीररित्या बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात येत होती. मात्र याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने येथील शेतकऱयाने जागेवर बांधकाम सुरू केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत आवश्यक कारवाई करावी, अन्यथा धरणे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

शहरातील सरकारी जागांवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी नेहमी होत आहेत. पण महापालिका आणि बुडाचे दुर्लक्ष झाल्याने अशा प्रकारात वाढ झाली आहे. अनगोळ येथील सर्व्हे क्र. 654 मध्ये बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार बुडा आयुक्त व महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे या सरकारी जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर जागेतील बांधकाम तातडीने थांबविण्यात यावेत अशी तक्रार करण्यात आली आहे.

अन्यथा महापालिकेवर मोर्चा

संबंधीत अधिकाऱयांनी तक्रारीची दखल येत्या आठ दिवसात न घेतल्यास महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा येथील नागरिकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Related Stories

खानापुरात शेतीच्या कामामुळे लॉकडाऊन नको

Patil_p

प. पू. पंन्यास भद्रानन्दविजयजी महाराज यांचे महानिर्वाण

Patil_p

कंग्राळी खुर्द येथे बलिदान मासला प्रारंभ

Amit Kulkarni

मनपाचे कोटय़वधीचे नुकसान

Patil_p

वळीव पावसाचा हेस्कॉमला दणका

Amit Kulkarni

रखवालदाराच्या खुनाचे गुढ कायम

Patil_p
error: Content is protected !!