तरुण भारत

कुंभोज तालुक्यात दिवसाढवळ्या 70 हजारांची चोरी


कुंभोज / वार्ताहर


कुंभोज तालुका हातकणंगले येथे बाहुबली रोडवर असणाऱ्या शिवाजीनगर येथे भरत भोसे यांच्या घरी आज पहाटे सहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात कोण नसल्याचे पाहून प्रवेश केला व झोपेत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जीवे मारण्याची धमकी देऊन चोरुन नेले.

Advertisements


यामुळे कुंभोज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गेल्या आठ ते पंधरा दिवसातील कुंभोज परिसरातील ही तिसरी चोरी असून सध्या कुंभोज परिसरात भुरट्या पण धाडसी चोऱ्यांचा प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. भरत भोसे हे शिवाजी नगर बाहुबली रोड परिसरात राहतात परिणामी ते रोज नियमाप्रमाणे आज सकाळी पाचच्या दरम्यान व्यायामासाठी बाहेर गेले असता सदर अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममध्ये झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जीवे मारण्याची धमकी देऊन काढून नेले, यावेळी महिलेने आरडाओरड केला असता सदर व्यक्तीने तिथून पळ काढला, याबाबत भरत भोसे यांनी तात्काळ तंटामुक्त कमिटी कुंभोज व पोलीस पाटील यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली.


परिणामी दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांच्या मुळे कुंभोज परिसरात सध्या महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले असून काही ठिकाणी रात्री अपरात्री काही नागरिकांचे दरवाजे अज्ञात व्यक्ती वाजवत असल्याचे ही चर्चा होत आहे, तसेच काही ठिकाणी चोरटे चोरी करण्यासाठी घरात प्रवेश करत असताना सीसीटीव्ही फुटेज कैद झाले असून, सदर फुटेज तंटामुक्त कमिटी व हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परिणामी याबाबत हातकणंगले पोलिस स्टेशन,महात्मा गांधी तंटामुक्त समिती ग्रामपंचायत कुंभोज यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी कुंभोज परिसरातून व्यक्त होत आहे

Related Stories

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून कोरोना रुग्णाचे पलायन

Abhijeet Shinde

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Abhijeet Shinde

गांधीनगर येथे कन्नड फलकांना शिवसेनेच्यावतीने फासले काळे

Abhijeet Shinde

बीए भाग-2 च्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आभार फाटा ते शाहूनगर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा

Abhijeet Shinde

..तर यंत्रमागधारकांना दहा कोटीचे वाढीव वीजबिल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!