तरुण भारत

पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय

प्रतिनिधी / बेळगाव

एकीकडे होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या जातात. मात्र, दुसरीकडे याच उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते. वंटमुरी येथील शेवटच्या बस स्टॉपजवळील साई मंदिरानजीक पाण्याची पाईप फुटल्यामुळे पाणी रोज वाया जात आहे.

Advertisements

येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी चोवीस तास पाण्याची व्यवस्था वंटमुरी येथे करण्यात आली आहे. मात्र, येथील चोवीस तास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी याबाबत तक्रार केली असून अद्यापही येथील गळती निवारण्याकडे पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळत आहे. पाणीपुरवठा मंडळाने ताबडतोब या ठिकाणी लक्ष देऊन फुटलेल्या पाईपची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

अशोक चौक-आरटीओ सर्कल मार्गावर वाहतूक कोंडी

Omkar B

टिळकवाडीला वेळेत बस नसल्याने नाराजी

Patil_p

पीओपी टाळू…पंचारती ओवाळू

Omkar B

बेळगाव-बेंगळूर महामार्गावर होणार 60 ते 70 चार्जिंग स्टेशन्स

Amit Kulkarni

संतिबस्तवाड ग्रा. पं. च्या अध्यक्षपदी विठ्ठल अंकलगी

Amit Kulkarni

बूथस्तरिय एजंट नियुक्तीसाठी नावे द्या

Patil_p
error: Content is protected !!