तरुण भारत

देवाचिये द्वारी आता प्रशासक कारभारी!

कपिलेश्वर, चव्हाट गल्ली मारुती मंदिर, शहापूर अंबाबाई, गजानन महाराज भक्त परिवारासह 16 मंदिरांवर प्रशासक

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरासह बेळगाव शहर व जिल्हय़ातील 16 मंदिरांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांत एकच खळबळ माजली असून मंदिरातील सरकारी हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला जात आहे. जिल्हय़ातील आणखी किमान 26 मंदिरांवर प्रशासक नियुक्ती होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिराबरोबरच शहापूर येथील अंबाबाई देवस्थान, चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती देवस्थान, वडगाव येथील बनशंकरी, अंबाबाई देवस्थान, खिळेगाव, ता. अथणी येथील बसवेश्वर देवस्थान, होनगा, शहापूर, वडगाव, बसवण कुडचीसह जिल्हय़ातील एकूण 16 मंदिरांवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. प्रशासनाने 18 फेब्रुवारी रोजी प्रशासक नियुक्तीचा आदेश काढला असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सर्व 16 मंदिरांचा कारभार प्रशासक ताब्यात घेणार आहेत. त्यानंतर स्थानिक व्यवस्थापन कमिटय़ांचे अस्तित्वात धोक्मयात येणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार 4 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली धर्मादाय विभागाची बैठक झाली. या बैठकीत बेळगाव व जिल्हय़ातील 16 मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील सहा महिन्यांपर्यंत या मंदिरांवर प्रशासकांचा कारभार असणार आहे. नवी व्यवस्थापन कमिटी स्थापन होईपर्यंत किंवा पुढील सहा महिन्यांपर्यंत प्रशासक अधिकारावर असणार आहेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अचानक प्रमुख मंदिरांवर प्रशासक नेमण्याचे प्रयोजनच काय? याचा उलगडा झाला नाही. उपलब्ध माहितीनुसार सध्या प्रशासकीय कारभार ठेवून नंतर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भरणा व्यवस्थापन कमिटीवर करण्याचा यामागे घाट असावा, असा संशय व्यक्त केला जात असून या आदेशाला विरोध केला जात आहे. धर्मादाय विभागाचे साहाय्यक आयुक्त, धर्मादाय विभागाचे तहसीलदार, महसूल निरीक्षक, सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवस्थानचे अधीक्षक आदी अधिकाऱयांची प्रशासक म्हणून वेगवेगळय़ा मंदिरांवर नियुक्ती झाली आहे.

‘तरुण भारत’ने  रविवारी सायंकाळी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप प्रशासक नियुक्तीचा आदेश देवस्थान कमिटीकडे आलेला नाही. आदेश आल्यानंतरच त्यातील तपशील पाहून प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच सर्व मंदिरांवर प्रशासक कार्यरत होणार आहेत.

मंदिरांच्या गाभाऱयात सरकारचा हस्तक्षेप नको

या आदेशाला पत्रकार अशोक चंदरगी यांनीही विरोध केला असून मंदिरांच्या गाभाऱयात सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी मागणी केली आहे. यासंबंधी लवकरच आपण मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. हळूहळू या आदेशाविरुद्ध असंतोष वाढत जाऊन विरोधाची धार तीव्र होताना दिसते आहे. आता अचानक प्रशासक नियुक्तीचे प्रयोजनच काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकवर्गणीतून मंदिरातील धार्मिक कार्यक्रम चालविले जातात. महाप्रसाद, जत्रा-यात्रा असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम असोत, सर्वसामान्य भाविकांच्या सहभागातून मंदिरांचा कारभार चालतो. असे असताना मंदिरांच्या कारभारात सरकारी हस्तक्षेपाची आता काय गरज होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध काही मंदिरांच्या व्यवस्थापन कमिटय़ांनी कायदेशीर लढाईचीही तयारी केली आहे.

या मंदिरांचा कारभार आता प्रशासनाकडे…

क्र.प्रशासक नियुक्ती झालेली मंदिरे
1श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर
2श्री भैरदेव, कलमेश्वर, अश्वत्थ देवस्थान, होनगा
3बसवेश्वर, कलमेश्वर, ब्रह्मदेव देवस्थान, बसवण कुडची
4श्री बनशंकरी देवस्थान, वडगाव
5श्री अंबाबाई देवस्थान, शहापूर
6श्री गजानन भक्त परिवार मंडळ, शांतीनगर, टिळकवाडी
7श्री जिव्हेश्वर देवस्थान, माधवपूर-वडगाव
8श्री लक्कव्वादेवी देवस्थान, बेक्केरी, ता. रायबाग
9श्री उमारामेश्वर देवस्थान, रामतीर्थ, ता. अथणी
10श्री जालगार मारुती देवस्थान, चव्हाट गल्ली
11श्री बनशंकरीदेवी देवस्थान, सप्पार गल्ली, मा. वडगाव
12श्री पंचलिंगेश्वर देवस्थान, मुन्नोळी, ता. सौंदत्ती
13श्री बसवेश्वर देवस्थान, खिळेगाव, ता. अथणी
14श्री हनुमान देवस्थान, सौंदत्ती

Related Stories

‘ज्ञान प्रबोधन’मध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Patil_p

सोमवारीही पावसाची दमदार हजेरी

Amit Kulkarni

मुलांना नाहक चोरी प्रकरणात गोवल्याचा आरोप

Patil_p

कराड बाजार समितीची स्वागत कमान ढासळली

Patil_p

किराणा दुकानदार खून प्रकरणातील संशयिताला जामीन

Patil_p

ब्लॅक संडेमुळे शहरात जनरेटरची घरघर

Amit Kulkarni
error: Content is protected !!