तरुण भारत

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.  सिबिल स्कोअरवर आधारित गृहकर्जात 70 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.7 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या बँकेचे गृहकर्ज 6.70 टक्क्यांनी मिळणार आहे. 

Advertisements

सवलतीचा व्याजदर 31 मार्च 2021 पर्यंतच राहणार असून, 100 टक्के प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्यांना कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

एसबीआयच्या ग्राहकांना सिबिल स्कोअरच्या आधारे 75 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर सर्वात कमी 6.7 टक्के व्याज द्यावे लागेल. 75 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या गृहकर्जासाठी 6.75 टक्के व्याजदर असणार आहे.

Related Stories

मोदींचा बांगलादेश दौरा आजपासून

Amit Kulkarni

हवाई इंधनाचे दर 50 टक्के वाढले

Patil_p

देशात 24 तासात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा

datta jadhav

टिकटॉकसाठी व्हिडीओ बनवताना बंदूकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू

prashant_c

शेतकरी आंदोलनावरून संसदेत गदारोळ

Patil_p
error: Content is protected !!