तरुण भारत

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अंतिम मतदार यादी होणार जाहीर

हरकती, सूचनांनुसार मतदार याद्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर

प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हरकती, सूचनांनुसार दुरूस्त्या करून अंतिम मतदार यादी सुरू करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. अंतिम मतदार याद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल आयोगाकडे पाठविला जाईल. आयोग आदेश देईल, त्यानुसार अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील कोल्हापूरसह नवी मुंबई, औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्या संदर्भातील आदेश आल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकी बरोबरच मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासक डॉ. बलकवडे यांची पत्रकारांनी भेट घेऊन माहिती घेतली.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, प्रारूप मतदार यादीवर 1800 हरकती आल्या आहेत. त्यांचे योग्य पद्धतीने निरसण करण्याबरोबर दुरूस्ती करण्याचे काम महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर करत आहे. अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी कोणतेही चूक राहू नये, यासाठी बारकाईने तपासणी केली जात आहे. 3 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. पण आता राज्य शासनाने ही यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी पुन्हा बारकाईने तपासणी केली जात आहे. आधीच्या नियोजनानुसार मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले आहे, पण आता मिळालेल्या मुदतवाढीत ते आणखीन अचूक करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी आढावा बैठकीत या संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.

Advertisements

फेरतपासणीनंतर संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्षात अंतिम मतदार याद्या केव्हा जाहीर करायच्या, याबाबत निवडणूक आयोग जो आदेश देईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्ष पाहणी, गुगल मॅपचा वापर

हरकती, सूचनांनुसार मतदार याद्या दुरूस्त करताना प्रत्यक्ष स्थळभेट, प्रत्यक्ष पाहणी, तपासणी करण्यात आली आहे. जीपीएस प्रणाली, प्रत्यक्ष नकाशा यानुसार तुलनात्मक अभ्यास केला आहे. काही बीएलओ नवीन होते, त्यामुळे उणीवा राहिल्या, पण अंतिम मतदार यादीत त्या दुरूस्त होतील. अचूक मतदार यादी असेल, असे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी करणार आंदोलन

triratna

कोल्हापूर : हुपरी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या १८० वर, पाच जणांचा मृत्यू

Shankar_P

मोटारचा शॉक लागून शिरोळ येथील एकाचा मृत्यू

Shankar_P

एमपीएससीच्या संधीवर मर्यादा घालणे अन्यायकारक : चंद्रकांत पाटील

Shankar_P

४ मे पासून व्यापार व उद्योग सुरु करण्यास परवानगी मिळावी; व्यापाऱ्यांची मागणी

triratna

कसबा सांगाव येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

triratna
error: Content is protected !!