तरुण भारत

वळपे येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- कॉलिस वाहनाची समोरासमोर धडक

कॉलिस गाडीचा दर्शनी भाग चक्काचूर

पेडणे / प्रतिनिधी

Advertisements

वळपे पेडणे  येथे राष्ट्रीय महामार्गावर पुलावर  सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान मालवाहू ट्रक व कॉलीस या चार चाकी वाहनाची धडक बसून कॉलीस गाडीचा दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन कॉलीस चालक गंभीर जखमी झाला.

  सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान पणजीहून महाराष्ट्रात देवदर्शनासाठी जात असताना वळपे येथे पंचायत कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर पुलावर हा आपघात झाला.  महाराष्ट्रात राज्यातून आलेला  एम.एच 07 ऐ.जे 1319 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक हा दयानंद प्रभू देवगड हा  चालक  पणजीच्या दिशेने जात असताना  पणजीहून महाराष्ट्र राज्यात जात असलेल्या जी.ए 01  – एस- 2236 या कॉलीस या  गाडीची धडक समोरा समोर दोन्ही वाहनाची झाली. ही धडक दोन्ही  वाहनाच्या  चालकाच्या बाचूने बसल्याने या  धडकेत कॉलीस गाडीचा चालक आनंद मलीमाट हा  गंभीर जखमी झाला. का?लिस गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर मालवाहू ट्रकचेही नुकसान  झाले.   पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. जखमीने 108 रुग्णवाहिकेने इस्पितळात नेण्यात आले.

Related Stories

सुरेश नार्वेकर यांचे निधन

Amit Kulkarni

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलातर्फे गोव्यात कोरोना योध्दा दिवस विविध उपक्रमांनी साजरा

Omkar B

म्हादईचे पाणी वळविल्याची मुख्यमंत्र्यांकडून कबुली

Patil_p

एकदिवशीय पावसाळी अधिवेशन आज

Omkar B

सरकारी नोकरीच करणार ही मानसिकता बदला

Amit Kulkarni

गँगवॉर सारखे प्रकार राज्यात पुन्हा घडता कामा नये

Patil_p
error: Content is protected !!