तरुण भारत

वाळपई नगरपालिकेसाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग 4 मधून प्रसन्ना प्रशांत गावस यांची उमेदवारी.

वाळपई / प्रतिनिधी

Advertisements

 20 मार्च रोजी होऊ घातलेल्या वाळपई नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे. आज प्रभाग चार मासोर्डे प्रभागातून प्रसन्ना प्रशांत गावस यांनी महिला आरक्षण विभागातून आपला उमेदवारी अर्ज  तालुक्मयाचे निवडणूक अधिकारी राजेश आजगावकर यांच्याकडे सादर केला.

 वाळपई नगरपालिका निवडणुकी मधून यंदा हा प्रभाग महिलांसाठी आरक्षण घोषित केलेला आहे .सध्यातरी या प्रभागातून एकमेव अर्ज दाखल झालेला आहे।. एकूण दहा प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 4 यातून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे.

 मंगळवार हा संकष्टीचा दिवस असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अर्ज सादर होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे .आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या उमेदवारात प्रभाग क्रमांक 1 मधून अनिल अरविंद काटकर प्रभाग क्रमांक 2 मधून एकनाथ बोर्येकर तर प्रभाग क्रमांक 4 मधून प्रसन्ना प्रशांत गावस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

दरम्यान भाजपाने आपली यादी अजून पर्यंत जाहीर केलेले नाही. तरीसुद्धा प्राप्त माहितीनुसार उमेदवार यादी निश्चित झाल्याचे समजते. मात्र अधिकृत उमेदवारी यादी खरोखरच जाहीर होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आरोग्य मंत्री तथा वाळपईचे आमदार श्?िवजित राणे सध्या परदेशात असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची बऱयाच प्रमाणात गोची झालेली आहे. यामुळे अनेकठिकाणी संभ्रमित अवस्था निर्माण झालेली असून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर आपल्याला  आमदार विश्वजीत राणे पाठिंबा देतील का याबाबतचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विचार सध्यातरी सोडून दिल्याचे समजते. सध्यातरी काँग्रेस पक्षातर्फे अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू असल्याची माहिती हाती आलेली आहे .मात्र अधिकृत उमेदवारांची यादी काँग्रेस पक्षातर्फे खरोखर जाहीर होणार का याबाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे.

दरम्यान आज उमेदवारी दाखल केलेल्या प्रसन्ना प्रशांत गावस यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना आपल्याला मोठय़ा प्रमाणात पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. या प्रभागातील मतदारांनी आपल्याला शब्द दिल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे .त्याचप्रमाणे स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचाही आपल्या उमेदवाराला हिरवा कंदील असल्याचे स्पष्ट केलेले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक प्रकाश गावस यांची उपस्थिती होती.

Related Stories

विजय सरदेसाईंचा काँग्रेसला धक्का, तृणमूलमध्ये जाणार ?

Amit Kulkarni

काँग्रेसच्या गट, जिल्हा समित्या बरखास्त

Amit Kulkarni

केरी पंचायत क्षेत्रात संचारबदीला नागरिक, दुकानदारांचा चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

सुर्लतील शेती पाण्याखाली

Patil_p

तेजोपासनेतून तेजोमय संस्कृतीचे दर्शन घडवूया सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींद्वारा शुभसंदेश

Amit Kulkarni

बोरी येथील लोखंडी पुलाचा भाग कोसळला

Patil_p
error: Content is protected !!