तरुण भारत

एसजी, साईराज वॉरियर्स, युनायटेड, नरवीर, पीसीसी संघांचे विजय

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

श्री चषक खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या आंतरजिल्हा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसजी स्पोर्ट्स, साईराज वॉरीयर्स, युनायटेड युथ, नरवीर वडगाव, पांडुरंग सीसी चिकोडी संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. विनायक तेवळे, मतिन मुल्ला, पवन उपाध्ये, रब्बानी दफेदार, सुमेद कंग्राळकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisements

व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पाटील क्रिएशन संघाने 7 षटकात 8 बाद 60 धावा केल्या. त्यात परशराम गुरवने 19, सचिन पाटीलने 15 धावा केल्या. एसजीतर्फे दिगंबर काटकळने 2 तर प्रवीण शिंदेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एसजी स्पोर्ट्सने 6.3 षटकात 2 बाद 63 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. त्यात सुमेद कंग्राळकरने 34 धावा केल्या. दुसऱया सामन्यात डीबी स्पोर्ट्स संघाने 7 षटकात 8 बाद 39 धावा केल्या. साईराजतर्फे रब्बानी दफेदारने 6 धावात 4 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना साईराज वॉरीयर्सने 4.3 षटकात 2 बाद 42 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिकला. मदन बेळगावकरने 20 धावा केल्या. डीबीतर्फे दयानंदने 2 गडी बाद केले. तिसऱया सामन्यात युनायटेड युथने 7 षटकात 2 बाद 92 धावा केल्या. आदिराजने 35 धावा केल्या. चव्हाण ब्रदर्सतर्फे विशाल हंडेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल चव्हाण ब्रदर्सने 7 षटकात 3 बाद 63 धावाच केल्या. त्यात मंजू पाटीलने 35 धावा केल्या. चौथ्या सामन्यात नरवीर वडगावने 7 षटकात 3 rबाद 77 धावा केल्या. त्यात अशोक भोसलेने 48 धावा केल्या. तालिम कट्टातर्फे राकेशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल तालिम कट्टा बस्तवाड संघाचा डाव 4.3 षटकात 24 धावात आटोपला. वडगावतर्फे मतिन मुल्लाने 3 धावात 6 तर बिपीनने 12 धावात 2 गडी बाद केले. पाचव्या सामन्यात पांडुरंग सीसी चिकोडी संघाने 7 षटकात 3 बाद 100 धावा केल्या. त्यात विनायक तेवळेने 43 धावा केल्या. हंगरगातर्फे तलवारने 2, दुर्गेशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल जयभीम हंगरगा संघाने 7 षटकात 9 गडीबाद 59 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे किरणने 2 तर तेवळेने 1 गडी बाद केला.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे राजू केलगेरे, नागेश पावशे, सचिन कुडची, सुशांत चव्हाण, रमेश गोदवाणी, राजेश सालगुडे, संतोष कुगजी, युवराज बिर्जे, वैभव बडिगेर यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

मंगळवारचे उपांत्यपूर्व सामने : 1) साईराज वॉरीयर्स वि. अल-रझा सकाळी 9 वाजता. 2) आरोही स्पोर्ट्स वि. नरवीर वडगाव स.11 वाजता. 3) मराठा स्पोर्ट्स ग्रामीण वि. युनायटेड युथ मजगाव दु. 1 वाजता. 4) एस. जी. स्पोर्ट्स वि. पांडुरंग सीसी दु. 3 वाजता.

Related Stories

सिव्हिलमध्ये 20 जण आयसीयुमध्ये

Patil_p

माणिक होनगेकर यांचे निधन : दोन दिवस मार्केट बंद ठेऊन दुखवटा

Rohan_P

योग दिन आज ऑनलाईनद्वारे साजरा करणार

Patil_p

रोहयोच्या कामगारांना शिवाजी कागणीकरांकडून मार्गदर्शन

Patil_p

चलवेनहट्टी क्रॉसजवळ चेकपोस्टची उभारणी

Amit Kulkarni

साहित्य संमेलनासाठी कडोलीनगरी सज्ज

Patil_p
error: Content is protected !!