तरुण भारत

शेतकऱयांना आर्थिक बळकटी देणाऱया काजूबागा

काजू झाडांना मोहोर बहरला : बदलत्या हवामानामुळे काजूला फटका बसण्याची दाट शक्मयता ; योग्य हमीभाव मिळण्याची नितांत आवश्यकता

आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी

Advertisements

शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये फळबाग शेती व्यवसाय अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बेळगाव तालुक्मयात काजूच्या बागायती मोठय़ा प्रमाणात आहेत. उन्हाळय़ातील दोन ते तीन महिने याचे पीक मिळते. या काजू बागायती शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरत आहेत. असे असले तरी या फळबागायतदार शेतकऱयांना काळानुरुप अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या गेल्या दहा-बारा दिवसांत वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. अवकाळी पाऊस व धुक्मयामुळे काजूच्या झाडांना बहरून आलेला मोहोर खराब होत असल्यामुळे शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बेळगावसह खानापूर तालुक्मयात सध्या काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून काजू झाडांना मोहोर बहरून आलेला आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील शिवारांमध्ये काजू झाडांना फळधारणाही होऊ लागली आहे. काजू बागेची साफसफाई करण्यात शेतकरीवर्ग व्यस्त आहे. काजू झाडांना बऱयापैकी मोहोर बहरून आला आहे, मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व सध्या पडत असलेल्या धुक्मयामुळे मोहोर खराब होऊन गळून पडू लागला आहे. याची चिंता उत्पादक शेतकऱयांना लागली आहे.

तालुक्मयातील बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, बोकनूर, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, उचगाव, कुदेमानी, बाची, बसुर्ते, बेकिनकेरे, जानेवाडी, कर्ले, बहाद्दरवाडी, किणये, नावगे, रणकुंडये, वाघवडे, संतिबस्तवाड, मच्छे, झाडशहापूर, बाळगमट्टी आदी भागात काजूच्या बागायती आहेत.

चंदगड तालुक्यातही सर्वाधिक उत्पादन

चंदगड तालुक्मयातही काजूचे उत्पादन सर्वाधिक घेण्यात येते. शेतातील बांधावर खास बागायती करून tबागा तयार करतात. रोप लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर झाडांना फळधारणा होते. ही बाग कमी खर्चात अधिक फायदेशीर ठरत असल्यामुळे बहुतांशी शेतकरी काजू बागा तयार करण्यावर भर देऊ लागले आहेत. काजू उत्पादनातून मिळणाऱया उत्पन्नावर शेतकऱयांचे अर्थकारण अवलंबून असते. वर्षभरासाठी लागणारी खते, बी-बियाणे, मुलांचा शैक्षणिक खर्च, लग्नकार्य आदी बाबी या उत्पन्नावर अवलंबून असतात. यामुळे काजू बागायतदारांसाठी या बागायती महत्त्वाच्या आहेत.

मजुरांचा तुटवडा

पश्चिम भागातील शिवारांमध्ये काजू बागायती स्वच्छ करण्यात येत आहेत. मात्र, साफसफाई करण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासू लागला आहे. खेडय़ापर्यंत कारखाने पोहोचले असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलाही कारखान्यांत जाऊ लागल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱया महिलांना दिवसाकाठी 200 ते 280 रुपये प्रमाणे मजुरी मिळू लागली आहे तर शिवारात 150 ते 180 इतकी मजुरी मिळते. यामुळे बऱयाच महिलांचा कल औद्योगिक कारखान्याकडे वळू लागला आहे. तसेच खेडय़ापाडय़ातील महिला रोहयोजनेंतर्गत सुरू असणाऱया कामांना जाऊ लागल्या आहेत. यामुळे साहजिकच शिवारात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. कोवळा मोहोर आणि फळधारणा प्रक्रियेवेळी टी-मॉस्कीटो नावाची कीड असते. ही कीड मोहोरामधील हिरव्या रंगाचा रस शोषण करते. त्यामुळे मोहोर जळून जातो. तसेच धुक्मयामुळेही मोहोर तपकिरी रंगाचा होऊन गळून पडतो. या भागात काजूच्या इतक्मया प्रमाणात बागायती आहेत. कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी काजू बागायतदारांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

गतवषी काजूला प्रतिक्विंटल 9 हजार ते साडेनऊ हजार असा दर मिळाला होता. या तुलनेत 2019 साली प्रतिक्विंटल 12 हजार 500 असा दर मिळाला होता. मागील वषी काजूला कमी दर मिळाला असल्यामुळे उत्पादक शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काजूला किमान 20 हजार रुपये प्रतिक्विंटल दर हा मिळालाच पाहिजे, असे उत्पादक शेतकऱयांचे म्हणणे आहे.

काजू प्रक्रियेवर भर द्यावा

काजूच्या गराला सर्वसाधारण 600 ते 900 रुपये प्रतिकिलो असा दर असतो. तसेच तालुक्मयात काजूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱयांनी लघुउद्योग म्हणून काजूवर प्रक्रिया करून त्याची स्वतः विक्री करणे फायदेशीर ठरू शकते. चंदगड परिसरात काजू प्रक्रिया उद्योग जोमाने सुरू आहे. तसेच बेळगुंदी भागातही काही जणांनी काजू प्रक्रिया करणाऱया युनिटची निर्मिती केली आहे. यामुळे काही महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.

योग्य हमीभाव मिळावा-जोतिबा नलवडे, बेळवट्टी

माळरानावरील बांधावर काजूची बाग केली आहे. यंदा मोहोर चांगला बहरून आला आहे, पण धुक्मयामुळे मोहोर खराब होऊ लागला आहे. या पिकांबाबत कृषी खात्याकडून मार्गदर्शन व सहकार्य मिळणे गरजेचे आहे. काजूला चांगला दर मिळाला तर काजूबाग शाश्वत ठरू शकते. सध्या आम्ही काजूच्या बागांची साफसफाई करू लागलो आहे. आम्हाला योग्य हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.

उदरनिर्वाह काजूच्या पिकांवरच-अरुण गुरव, बेळगुंदी

हवामानात होणाऱया बदलामुळे काजू उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी बागायती फलोद्यान खात्यामार्फत प्रत्येक ग्राम पंचायतीमार्फत मोहोर व फळांच्या संरक्षणाबाबत शेतकऱयांना माहिती पुरविली पाहिजे. कारण आम्हा बहुतांशी शेतकऱयांचा उदरनिर्वाह या काजूच्या पिकांवर अवलंबून आहे. तीन महिने काजू जमा करण्यासाठी शेतकऱयांना बरीच कसरत करावी लागते.

नावगे दरवषी काजूच्या मुरटय़ाची उचल करण्यात येते. गोव्याला या भागातील मुरटय़ाला मागणी आहे. गतवषी मात्र कोरोना महामारीमुळे मुरटय़ाची उचल झाली नाही. याचा फटका उत्पादक शेतकऱयांना बसला. सध्या तरी गोव्याला वाहतूक सुरू झाली आहे. मुरटय़ाच्या एका डब्याला 10 ते 12 रुपये दर मिळतो. हा दर किमान 15 रुपये तरी द्यावा, अशी आम्हा काजू बागायतदारांची मागणी आहे.

मुरटय़ाच्या डब्याचा दर वाढवा-कृष्णा पाटील,

Related Stories

मनपा कार्यालयात प्रवेशबंदीमुळे गर्दी वाढली

Patil_p

किल्ले राजगड ते रायगड पदभ्रमंती यशस्वी

Patil_p

भाजीविक्रेत्या महिलांची निदर्शने

Patil_p

उसाची उचल करण्यासाठी शेतकऱयांची धावपळ

Omkar B

वारकऱयांवर गाणे तयार

Omkar B

स्मार्ट सिटीची सुरू असलेली कामे तातडीने करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!