तरुण भारत

बंदर प्रकल्पांमध्ये अब्जावधींची गुंतवणूक

मेरीटाइम इंडिया परिषदेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ – गुंतवणुकीवर भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेरीटाइम इंडिया परिषद 2021 चे उद्घाटन केले आहे. 50 देशांच्या 1 लाखांहून अधिक जणांनी परिषदेसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ही शिखर परिषद सागरी क्षेत्राच्या प्रमुख घटकांना एकत्र आणणार आहे तसेच भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासाला पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 2035 पर्यंत बंदर प्रकल्पांमध्ये 82 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी यावेळी विदेशी गुंतवणुकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.परिषदेच्या उद्घाटन सत्रात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी भाग घेतला आहे.

भारत सरकार देशांतर्गत जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती बाजारावरही लक्ष देत आहे. देशांतर्गत जहाजनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय शिपयार्डकरता वित्तीय सहाय्य धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. 78 बंदरांच्या क्षेत्रात पर्यटन विकसित करण्यात येत आहे. दीपस्तंक्ष तसेच त्याच्या परिसरातील क्षेत्रांना अद्वितीय सागरी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा यामागे उद्देश असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

भारताच्या बंदरांनी इनबाउंड तसेच आउटबाउंड कार्गोसाठी प्रतीक्षा कालावधी खूपच कमी केला आहे. बंदर आणि प्ले-अँड-प्ले पायाभूत सुविधेत साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहोत. यातून उद्योगांना पोर्ट लँडसाठी आकर्षित करता येणार आहे. 2014 मध्ये प्रमुख बंदरांची क्षमता सुमारे 870 दशलक्ष टन प्रतिवर्ष होती, आता हेच प्रमाण 1550 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे. या उत्पादकता लाभामुळे केवळ बंदरेच नव्हे तर समग्र अर्थव्यवस्थेला बळ मिळाल्याचे मोदी म्हणाले.

3 दिवस चालणार परिषद

या परिषदेचे आयोजन बंदर, बंदर परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. 2 ते 4 मार्चदरम्यान ही परिषद पार पडणार आहे. यात अनेक देशांचे प्रतिनिधी स्वतःचे विचार मांडतील. तीन दिवसीय या शिखर परिषदेकरता डेन्मार्क सहकारी देश आहे.

आत्मनिर्भर भारत

सागरी क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. देशातील बंदरांचे आधुनिकीकरण होतेय. या क्षेत्रातील गुंतवणुकीला बळ देण्यासाठी नवे व्हिजन तयार केले आहे. भारतीय सागरी क्षेत्रात आधुनिकीकरण, विकास, क्रूज पर्यटन, रोपॅक्स, फेरी सेवा, सीप्लेन सेवेची मागणी वाढत असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे.

Related Stories

राज्यसभेत भाजपसह काँग्रेसनेही रचला ‘इतिहास’

Patil_p

महागाईने वाढविले ‘टेन्शन’

Patil_p

शाहीन बाग नव्हे, शैतान बाग : तरुन चुघ

prashant_c

अमरनाथ, कैलास मानसरोवर यात्रा नोंदणी लांबणीवर

Patil_p

जयंत चौधरी रालोदचे नवे प्रमुख

Patil_p

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

datta jadhav
error: Content is protected !!