तरुण भारत

बुडालेल्या जहाजातून बियरचा साठा लंपास

आता समुद्राच्या तळाला झाली चोरी, बियरची 131 पिंपांना चोरांनी केले लंपास

पृथ्वीवर राहणारे चोर आता समुद्राच्या तळालाही चोरी करू लागले आहेत. दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटीनाच्या किनाऱयावर बुडालेल्या जहाजात ठेवण्यात आलेली बियरचे 131 पिंपे (गॅलन) चोरांनी पळविली आहेत. या बियरला मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात समुद्राखाली ठेवण्यात आले होते, जेणेकरून अनेक वर्षांनी ती बाहेर काढून महागडय़ा दरात विकता येतील. ही लिमिटेड एडिशन बियर होती.

सुमारे 1 हजार गॅलन बियर अर्जेंटीनाच्या किनाऱयापासून तीन मैल अंतरावर समुद्रात बुडालेल्या मासेमारीच्या जहाजात ठेवण्यात आली होती. मागील आठवडय़ात पाणबुडे समुद्रातील बियरची तपासणी करण्यास गेले असता त्यातील 131 गॅलन बियर गायब असल्याचे आढळून आले. चोरी करण्यात आलेली ही बियर तीन स्थानिक कंपन्यांची होती. या कंपन्यांनी समुद्रात बियर ठेवण्यासाठी मागील वर्षी पाणबुडे नियुक्त केले होते.

बियरचा हा साठा सोव्हिएत संघाच्या काळातील क्रोनोमेथेर या जहाजात ठेवण्यात आला होता. या जहाजाला सोव्हिएत संघाच्या पतनानंतर अर्जेंटीनातच सोडण्यात आले होते. 2014 मध्ये हे जहाज बुडाल्याचे समोर आले होते. अशाप्रकारे मद्य समुद्रात ठेवण्याचा प्रकार अर्जेंटीनातूनच सुरू झाला आहे. पण समुद्रात बियर ठेवण्याची त्यांची कल्पना नुकसानीची ठरली आहे.

Related Stories

भारतीय ‘मिशन मंगळ’नंतर चीनचे  ‘रोवर मिशन टू मार्स’ लॉन्च

pradnya p

अमेरिकेत कोरोनाचे थैमान, एका दिवसात 32 हजार नवे रुग्ण

prashant_c

भारताचा दबाव, नेपाळ नरमला

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.25 लाखांवर

datta jadhav

काश्मीर कन्येची बायडेन यांच्या ‘डिजिटल स्ट्रॅटेजी टीम’मध्ये निवड

datta jadhav

स्पेनमध्ये घेतला मुलांनी मोकळा श्वास

Patil_p
error: Content is protected !!