तरुण भारत

चीनचा सायबर हल्ला केला असफल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

चीनने काही महिन्यांपूर्वी सायबर हल्ला करून मुंबईतील वीज पुरवठा बंद पाडला होता, असे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यावर भारताच्या वीजनिर्मिती विभागाने मंगळवारी स्पष्टीकरण दिले. चीनने भारताचे संगणक बंद पाडण्याचा आणि वीजपुरवठय़ात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तो हाणून पाडण्यात आला असून आता कोणतीही समस्या नाही असे विभागाने स्पष्ठ केले आहे. चीनच्या या हल्ल्याची महिती अमेरिकेच्या एका संस्थेने दिली होती.

रेड ईको हा चीनमधील धोकादायक हॅकिंग गट आहे. या गटाला चीनच्या सरकारचे उघड समर्थन आहे. हा गट केवळ भारतातच नव्हे तर चीनशी स्पर्धा असणाऱया इतर देशांच्या संगणकीय कामकाजातही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी चीनने विशेष प्रकारचे संगणकीय सॉफ्टवेअर विकसीत केले आहे.                                        

Related Stories

महिला कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

Patil_p

21 पोलीस कर्मचाऱयांसह जम्मू-काश्मीरमध्ये 59 संक्रमित

Patil_p

आर-पार लढाईसाठी सैन्य सज्ज!

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 11, 739 वर

pradnya p

भारतीय रेल्वेविरोधात चिनी कंपनी उच्च न्यायालयात

datta jadhav

देहरादूनमधील प्राचीन मंदिर टपकेश्र्वर बंद; पुजारी कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p
error: Content is protected !!