तरुण भारत

संदीप चौधरीने उत्तेजक चाचणी टाळली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणारा भारताचा विश्वविजेता भालाफेक ऍथलीट संदीप चौधरीवर येथे स्पर्धेपूर्वी घेण्यात येणारी उत्तेजक चाचणी टाळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदर माहिती अखिल भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीच्या अधिकाऱयांनी दिली.

भारतीय शासनाच्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम (टीओपीएस) योजनांतर्गत येथील जवाहरलल नेहरू स्टेडियमच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या सरावावेळी कोरोना संदर्भातील नियमांचे बंधन ठेवण्यात आले होते. विदेशातून उत्तेजक चाचणी घेणाऱया पथकाने संदीप चौधरीच्या मूत्रल नमुन्यांची मागणी केली होती पण चौधरी यावेळी या स्टेडियमच्या संकुलात उपस्थित नव्हता. 24 वर्षीय संदीप चौधरीने 2018 च्या आशियाई पॅरा स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. टोकियोमध्ये होणाऱया पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी त्याची भारतीय पॅरा ऑलिंपिक संघामध्ये निवड झाली होती. त्याचप्रमाणे सुंदर सिंग गुर्जर आणि सुमीत या दोन भारतीय पॅरा ऍथलीट्सचाही समावेश झाला आहे.

Related Stories

मनोज दशरथनचा पलानीवर विजय

Patil_p

व्हिएतनाममध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा तहकूब

Patil_p

निशीकोरी, डिमिट्रोव्ह, सिलीक दुसऱया फेरीत

Patil_p

भारत-जर्मनी हॉकी लढत बरोबरीत

Patil_p

विश्व सांघिक टेनिसमधून कॉलिन्सची हकालपट्टी

Patil_p

क्रिकेटपटू कुशल मेंडीसला अटक

Patil_p
error: Content is protected !!