तरुण भारत

शाहूनगरच्या अमराईमध्ये हाणामारी

सदर प्रकरणी 35 जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/सातारा

साताऱयातील शाहूनगर परिसरातील अमराई रेसिडेन्सी अपार्टमेंट, जगतापवाडी येथे अपार्टमेंट परिसरात जागेची लेवल व साफसफाई करण्यासाठी जेसीबी बोलावल्याच्या कारणातून व तिथे असलेल्या जागेच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून दोन्ही गटातील 35 जणांवर पोलिसांनी गर्दी, मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास जेसीबी बोलावून परिसरातील जागेची साफसफाई व लेवल करत असताना  त्याच अपार्टमेंटमधील अनिल महादेव जाधव, प्रकाश एकनाथ बोधे, उषा भीमराव निकम, संगिता अनिल जाधव, वनिता दत्तात्रय इंगळे व तेथीलच 30 ते 35 लोकांनी तक्रारदार गौरी बाळासाहेब जगताप यांच्या भावास मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या जगताप यांना देखील मारहाण झाल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर यावेळी जेसीबी चालकास शिवीगाळ करुन दंडेलशाहीने हाकलून दिल्याची तक्रार गौरी बाळासाहेब जगताप (रा. औदुंबर निवास, शाहूनगर, जगतापवाडी, सातारा) यांनी दिली असून याप्रकरणी 35 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तर संगिता अनिल जाधव (वय 45, रा. आमराई अपार्टमेंट, जगतापवाडी, शाहूनगर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत जेसीबी चालक, गणेश बाळासाहेब जगताप, कलम बाळासाहेब जगताप, गणेश जगताप यांची पत्नी नाव माहिती नाही यांनी यांना सार्वजनिक रस्ता खोदण्यास मनाई केल्याने या सर्वांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्या पतीच्या अंगावर धावून जात तू बाहेर भेट तुला दाखवतोच, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.  यावेळी महिलांच्या अंगावर हे सर्व धावून दगड मारत होते अशीही तक्रार केली असून याप्रकरणी गौरी जगताप यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटातील 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोकडे करत आहेत.

Related Stories

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्याचे फडणवीसांना आमंत्रण नाही ; भाजप नेते नाराज

triratna

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश, महावितरणचे मौन

triratna

हणमंतवाडीत साकारले 1 हेक्टर 16 आर क्षेत्रात घरकुले

Patil_p

आर्थिक गणनासाठी येणाऱ्या प्रगणकास वस्तुनिष्ठ माहिती देवून सहकार्य करावे

triratna

पावसाने विश्रांती घेतल्याने धरणे अर्ध्यावरच, दुष्काळी तालुक्यातील शेती धोक्यात

Shankar_P

डिव्हिडंड मंजूरीचे अधिकार संचालक मंडळाला द्या : आ. ऋतुराज पाटील

Shankar_P
error: Content is protected !!