तरुण भारत

आरोग्य विभागाच्या भरतीत गोंधळ; काळ्य़ा यादीतील कंपन्यांकडे सूत्रे

दापोली/ प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क व ड श्रेणी दर्जाच्या कर्मचाऱयांच्या भरती प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाला आहे. एकाच बेंचवर दोन विद्यार्थी, प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच काळ्या यादीतील कंपनीकडे भरतीची सूत्रे असल्याची धक्कादायक बाबही प्रकाशात आली. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी नियम 93 अन्वये विधान परिषदेत सूचना दाखल करून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

Advertisements

  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीसाठी रविवारी घेतलेल्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर गोंधळ व नियोजनाचा अभाव होता. काही ठिकाणी अर्धा तास उशिरा परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे वाटपही योग्य पद्धतीने केले गेले नाही. नागपूरच्या विद्यार्थ्याला पुण्यात तर पुण्यातील विद्यार्थ्याला नागपूरमध्ये केंद्र देण्यात आले. काही केंद्रांबाबत अधिकाऱयांनाही माहिती नाही. परिणामी एकाच बेंचवर 2 विद्यार्थी बसवले गेले. विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिकेचे सील उघडण्याचा नियम आहे. मात्र या परीक्षेत आधीच प्रश्नपत्रिकेचे सील उघडण्यात आले होते. या प्रकारावर आक्षेप घेणाऱया विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. संबंधित परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले होते. मात्र चक्क काळ्य़ा यादीत असलेल्या एका कंपनीला भरती प्रक्रियेचे काम सोपवण्यात आले. याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी नियम 93 अन्वये दाखल केलेल्या सूचनेद्वारे लक्ष वेधण्यात आले. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरलेल्या उमेदवारांना केवळ एकाच पदासाठी परीक्षा देता आली. त्यामुळे 2 वर्षांपासून अभ्यास व तयारी करणाऱया विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, असा मुद्दाही आमदार डावखरे यांनी मांडला आहे.

  महाविकास आघाडी सरकारकडून घाईघाईत होणाऱया भरती प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. तसेच संबंधित परीक्षा रद्द करून एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी केली.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Abhijeet Shinde

तिवरे पुनर्वसनास प्रारंभ; कंत्राटे मात्र राष्ट्रवादीला

Abhijeet Shinde

भरधाव रेल्वेची अल्टरनेट पुली उडून महिला जखमी!

Patil_p

जिल्हय़ातील 103 संशयितांचे अहवाल अद्यापही प्रतीक्षेत

Patil_p

उत्पादन शुल्क महसूल उद्दिष्टात तीन कोटीने मागे

NIKHIL_N

जिल्हय़ातून व्यापाऱयांचा विरोध..काहींचा पाठिंबा!

Patil_p
error: Content is protected !!