तरुण भारत

गोवा माईल्स रद्द न केल्यास सहकुटुंब रस्त्यावर येणार

टॅक्सी मालक संघटनेचा इशारा

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोवा माईल्सला सरकार थारा देत असल्याने गोव्यातील टॅक्सी मालकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. बेकायदेशीरपणे सुरु केलेल्या गोवा माईल्स ऍप टॅक्सीचे परवाने 31 मार्चपर्यंत रद्द न केल्यास सहकुटुंब रस्त्यावर येणार, असा इशारा टॅक्सी मालक संघटनेने दिला आहे. पुढे ज्या काही गोष्टी घडतील त्याला सरकार जबाबदार असणार असल्याचेही टॅक्सी मालक संघटनेने सांगितले.

काल मंगळवारी टॅक्सी मालक संघटनेने वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांची भेट घेऊन गोवा माईल्स ऍप रद्द करण्याची मागणी केली होती. टॅक्सी मालक संघटनेला उत्तर देताना सातार्डेकर म्हणाले की गोवा माईल्स ऍपला परवाना देणे हा सरकारचा निर्णय असून तो सरकारच्या धोरणानुसार घेण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयापुढे आपण काहीच करू शकत नाही. असेही सातार्ड़ेकर यांनी स्पष्ट साग़ितले. राज्यात सुमारे 22 हजार कुटुंबे टॅक्सी व्यवसायावर अवलंबून आहेत. परप्रांतातील लोक गोव्यात येऊन टॅक्सी व्यवसाय करू लागले तर गोव्यातील टॅक्सीवाल्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सचालक सातार्डेकर यांच्यावरही टॅक्सी मालकांनी टीकी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मोठय़ा संखेने टॅक्सी मालक वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर जमले होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही कडक तैनात करण्यात आला होता. केवळ 15 लोकांच्या शिष्टमंडळाला संचालकांना भेटण्याची अनुमती देण्यात आली होती.

Related Stories

महामारीचा मोटार सायकल पायलटांना फटका

Omkar B

श्रीपादभाऊंची प्रकृती स्थीर

Omkar B

म्हापशातील रंगकर्मी रंजन मयेकर यांचे कोविडमुळे निधन

Amit Kulkarni

महिलांनी सर्वकषपणे विचार करावा सुलक्षणा सावंत यांचे आवाहन

Amit Kulkarni

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कला अकादमीची दुरुस्ती

Amit Kulkarni

मडगावातील प्रसिद्ध विचार वेध व्याख्यानमाला 8 जानेवारीपासून

Patil_p
error: Content is protected !!