तरुण भारत

सर्वांच्या नजरा सभापतींच्या निवाडय़ाकडे

बारा आमदार अपात्रता प्रकरण

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

साऱयांच्या नजरा पुन्हा एकदा सभापतींच्या निवाडय़ाकडे लागल्या असून या आठवडय़ात सभापती राजेश पाटणेकर हे आमदार अपात्रता प्रकरणी निवाडा देण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपमध्ये 2019 मध्ये गेलेल्या काँग्रेसचे 10 आणि मगोचे 2 मिळून एकूण 12 आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिका सभापतींसमोर आहेत. त्यांवर दि. 26 फेब्रुवारी रोजी सभापतींनी सुनावणी पूर्ण करुन निवाडा राखीव ठेवलेला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील या अपात्रता संदर्भातील सुनावणी दि. 8 मार्च रोजी होणार असल्याने पुढील तीन-चार दिवसांत सभापती निवाडा देतील, असे वृत्त आहे. सभापती पाटणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. परंतु सध्या सभापती राजेश पाटणेकर हे या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहेत. अपात्रता प्रकरणी सभापतींचा निवाडा हा ऐतिहासिक असणार आहे.

बाराही आमदार अपात्र ठरले तर…?

या निवाडय़ातून 12 ही आमदार अपात्र ठरले तर त्यानंतर 12 ही जण न्यायालयात स्थगितीसाठी जाऊ शकतात. न्यायालयातूनही अपात्र ठरले व सभापतींचा निवाडा उचलून धरला तर 12 जागांसाठी सहा महिन्यात निवडणुका घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. सभापतींनी मगो व काँग्रेसच्या दोन्ही याचिका फेटाळल्या तर त्यास मगो व काँग्रेस मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. सभापतींनी केवळ 2 जणांनाच अपात्र ठरविले तर दोन आमदार न्यायालयात आव्हान देऊ शकतात. काँग्रेसवाले पुन्हा न्यायालयात जाऊ शकतात.  एकंदरीत सभापतींच्या निवाडय़ानंतर राज्यातील राजकारण बरेच तापणार अशी चिन्हे आहेत. सभापती रविवारपर्यंत आपला निवाडा देऊ शकतात. हा निवाडा कोणता असेल? याकडे साऱया जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत. सभापती विविध पातळीवर कायदेशीर सल्ला मसलत करीत आहेत.

Related Stories

स्व. मनोहर पर्रीकरांच्या कल्पनेतील राज्यात बंधारे बांधण्याचे नियोजन झाले तर म्हादई आमच्यापुढे मोठी समस्या नाही- माजी मंत्री दयानंद मांद्रेकर

Omkar B

रेती काढण्यासाठी कायदेशीर परवाना केव्हा देणार

Patil_p

हरमल येथे आज पावणेर तरंगोत्सव उत्सवाची सांगता

Amit Kulkarni

आता जनतेनेच परिवर्तन घडवून आणावे

Omkar B

खनिज हाताळणीस न्यायालयाचा हिरवा कंदील

Patil_p

अतीगंभीर कोरोना बाधीत रुग्णांना गोमेकॉत राखीव वॉर्ड

Patil_p
error: Content is protected !!