तरुण भारत

मनपासह सात पालिकांसाठी 204 अर्ज

उमेदवारी दाखल करण्यात भाजपची आघाडी : पणजीत विरोधकांच्या गटात सामसूम मात्र काही अपक्षांची रिंगणात उडी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्यातील पणजी महानगरपालिका आणि सहा पालिकांच्या दि. 20 मार्च रोजी होणाऱया निवडणुकीसाठी अनुक्रमे 37 आणि 167 मिळून एकूण 204 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील सर्वाधिक अर्ज हे काल मंगळवारी दाखल झाले आहेत. त्यात प्रामुख्याने पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमधील 30 पैकी 29 उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी उद्या दि. 4 मार्च रोजी अंतिम दिवस आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील पाच पालिकांची निवडणूक रद्दबातल ठरविण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सहा पालिकांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. काल दि. 2 मार्च रोजी उत्तरेत 58 आणि दक्षिणेत 74 मिळून 132 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील उत्तर गोव्यातील डिचोली पालिकेसाठी 17, वाळपईसाठी 13, पेडणेसाठी 28 तर दक्षिण गोव्यातील कुडचडेसाठी 41, कुडचडे काकोडासाठी 20 आणि काणकोणसाठी 13 अर्जांचा समावेश आहे.

यापूर्वी दि. 26 फेब्रुवारी रोजी 6 अर्ज, 27 रोजी 5 आणि 28 रोजी 24 अर्ज दाखल झाले होते. आतापर्यंत दोन्ही जिह्यांमधील एकूण अर्जसंख्या 167 वर पोहोचली आहे.

पणजीत भाजपच्या 29 उमेदवारांचे अर्ज

पणजी मनपासाठी मंगळवारी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांमध्ये भाजपतर्फे वसंत आगशीकर, दीक्षा माईणकर, करण पारेख, अदिती चोपडेकर, किशोर शास्त्री, मनिषा मणेरकर, उदय मडकईकर, नरसिंह मोरजकर, लॉरेन डायस, प्रांजल नाईक, सुरैय्या पिंटो, शुभदा शिरगावकर, संजीव नाईक, शायनी चोपडेकर, शुभम चोडणकर, विठ्ठल चोपडेकर, शेखर डेगवेकर, प्रमय माईणकर, रोहित मोन्सेरात, वर्षा शेटय़े, सेंड्रा डिकुन्हा, अस्मिता केरकर, बेन्तो लॉरेना, करोलिना पो, माल्कम आल्फोन्सो, प्रसाद आमोणकर, राहूल लोटलीकर, युवराज फर्नांडीस, शैलेश साळगावकर यांचा समावेश होता.

सात अपक्षही उतरले रिंगणात

त्याचबरोबर शॅरोल मेन्डोन्सा, विष्णू नाईक, वैष्णवी उगाडेकर, सिल्वेस्टर फर्नांडीस, कृष्णा शिरोडकर, व्यास प्रभू चोडणकर, नागेश करीशेट्टी या अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत.

सांखळी प्रभाग 9 साठी 3 अर्ज

सांखळी पालिकेच्या प्रभाग क्र. 9 मध्ये होणाऱया पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 3 अर्ज दाखल झाले आहेत.

नावेली जिं. पं. साठी मंगळवारी पहिला अर्ज

दक्षिण गोव्यातील नावेली (सर्वसाधारण) जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी पहिलाच अर्ज दाखल झाला आहे.

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकूण 29 अर्ज

राज्यातील 20 पंचायतींच्या 22 प्रभागांसाठी होणाऱया पोटनिवडणुची अर्ज दाखल प्रक्रियाही सुरू असून त्यासाठी मंगळवारी 23 अर्ज दाखल झाले आहेत. त्याद्वारे एकूण अर्जांची संख्या 29 झाली आहे. आगशी, मेरशी, भिरोंडा, म्हावूस, पिसुर्ले, हरमल, कोरगाव, मोरजी, कारापूर सर्वण, मुळगाव, ओशेल, वेर्ला काणका आणि बस्तोडा या उत्तरेतील तर असोळणा, नावेली, बाळ्ळी अडणे, वेलिंग प्रियोळ कुंकळी, भाटी, रिवण आणि चिखली या दक्षिणेतील पंचायती आहेत.

Related Stories

लोकांना एकत्र करुन मेळावलीवासियांना न्याय देणार

Patil_p

सर्वसमावेशक अर्थसंकल्प!

Patil_p

लोकवस्तीजवळ आलेल्या मगरीची सुटका

Patil_p

पेडणे पोलिसांनी दुचाकी चोरटय़ास अटक

Amit Kulkarni

’फॅमिली राज’ ला भाजपकडून प्रोत्साहन

Amit Kulkarni

विश्व मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी तानाजी, डॉ. कुडचडकर, डॉ. रिबेलो पात्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!