तरुण भारत

साईराज वॉरियर्स के. रत्नाकर शेट्टी चषकाचा मानकरी

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

वैभव कुरिबागी, विठ्ठल हबिब यांची दमदार फलंदाजी व शुभम भादवणकर, नरेंद्र मांगुरे यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर साईराज वॉरियर्स संघाने झेवर गॅलरी संघाचा मेगा अंतिम सामन्यात 28 धावानी पराभव करून पहिला के. रत्नाकर शेट्टी चषक पटकाविला. विठ्ठल हबिबने मालिकावीर पुरस्कार पटकावित दुचाकी वाहनाचे बक्षीस मिळविले.

के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रत्नाकर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या मेगा अंतिम सामन्यात झेवर गॅलरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले साईराज वॉरियर्सने 20 षटकात सर्व बाद 146 धावा केल्या. वैभव कुरीबागीने 1 षटकार, 4 चौकारासह 57, विठ्ठल हबिबने 5 षटकारासह 46 तर नरेंद्र मांगुरेने 12 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे किरण तरळेकरने 23 धावात 3, आकाश पत्तारने 22 धावात 3 तर पार्थ पाटील व ताहिर सराफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवर गॅलरी संघाचा डाव 18.3 षटकात सर्व बाद 118 धावात आटोपला. त्यात सुधन्वा कुलकर्णीने 1 षटकार, 2 चौकारासह 14, पार्थ पाटीलने 28 तर प्रथमेश लोहारने 2 षटकार, 1 चौकारासह 18 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे शुभम भादवणकरने 7 धावात 3, नरेंद्र मांगुरेने 22 धावात 3, संतोष सुळगे-पाटीलने 23 धावात 2 तर वैभव कुरीबागीने 1 गडी बाद केला.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, राजा शेठ, मिहीर पोतदार, अमन सेठ, प्रसन्ना केस्ती आदी मान्यवरांच्या हस्ते अंतिम सामन्यातील उत्कृष्ट झेल आदित्य कलपत्री, सर्वाधिक षटकार विठ्ठल हबिब, इम्पॅक्ट खेळाडू किरण तरळेकर, अंतिम सामन्यातील सामनावीर वैभव कुरीबागी, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज माजीद मकानदार (झेवर गॅलरी), उत्कृष्ट गोलंदाज किरण तरळेकर (झेवर गॅलरी), उत्कृष्ट यष्टीरक्षक दर्शन पाटील (डीके लायन्स), स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू पार्थ पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष सुळगे-पाटील (साईराज), उदयोन्मुख खेळाडू झीनत मुडबागील (साईराज) यांना चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर पुरस्कार विठ्ठल हबिब (साईराज) याला प्रसन्ना केस्ती यांनी पुरस्कृत केलेले इलेक्ट्रिक दुचाकी वाहन, चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून विशाल तुक्कार, प्रशांत गवाली तर स्कोअरर म्हणून रोहन होनुले तर ऑनलाईन स्कोअरर राकेश यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, चेतन बैलूर, अरिफ बाळेकुंद्री यांनी केले. सूत्रसंचालन चेतन बैलूर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेट्टी फौंडेशनचे सभासद प्रणय शेट्टी, प्रिती शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, पवन शेट्टी, परशराम पाटील, प्रशांत लायंदर, वासीम धामणेकर, मिलिंद चव्हाण यांनी परिश्रम घेतले. खेळपट्टीचे काम अनिल गवी, राजश्री पाटील यांनी केले.

महिलांच्या प्रदर्शनीय क्रिकेट लढतीत बेळगाव ब्लू संघ विजेता

बेळगाव  : के रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित कै. रत्नाकर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेदरम्यान बेळगावच्या महिला क्रिकेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांचा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. त्यात बेळगाव ब्लू संघाने बेळगाव रेड संघाचा 5 गडय़ानी पराभव केला. अश्मिरा बानुकनकी हिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर आयोजित महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात बेळगाव रेड संघाने 20 षटकात 5 बाद 153 धावा केल्या. त्यात नीता तुक्कारने 5 चौकारासह 54, झोया काझीने 3 चौकारासह 22 तर रश्मी उपाध्येने 10 धावा केल्या. बेळगाव ब्लूतर्फे श्वेता भाटीने 23 धावात 2 गडी बाद केले. त्यानंतर बेळगाव ब्लू संघाने 19.3 षटकात 5 बाद 154 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. त्यात अश्मिरा बानुकनकीने 6 चौकारासह 55, समृद्धी जाधवने 5 चौकारासह 34 तर श्वेता भाटीने 13 धावा केल्या. बेळगाव रेडतर्फे नीता तुक्कारने 25 धावात 2, अक्षा नदाफ, पद्मश्री साबण्णावर यांनी एकेक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्या माधुरी, करुणा लायंदर, इंदिरा जानवेकर, करुणा गोटगी, नीता शेट्टी, पूजा बेल्लद, रिचा हुन्नीकेरी, प्रक्षा गोटरी यांच्या हस्ते दोन्ही संघांना चषक, प्रमाणपत्र देण्यात आले.

Related Stories

नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी

Patil_p

भाजीपाला, कृषी उत्पादनांची संबंधीत तालुक्यातील बाजारपेठेत विक्री करा

tarunbharat

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने कर्तव्य बोध दिवस साजरा

Amit Kulkarni

दिल्ली सरकारकडे शेतकऱयांच्या समस्या मांडू

Patil_p

भुतरामहट्टीतील सिंहांचे पर्यटकांना लवकरच होणार दर्शन

Amit Kulkarni

मर्कंटाईल सोसायटीला अंशुमाला पाटील यांची भेट

Patil_p
error: Content is protected !!