तरुण भारत

अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मानधनवाढीसाठी ‘बेंगळूर चलो’

रेल्वेस्थानकापासून फ्रीडम पार्कपर्यंत मोर्चा

बेंगळूर : सेवाज्येष्ठतेच्या आधारे मानधनात वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यकांनी ‘बेंगळूर चलो’ आंदोलन छेडले. राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी बेंगळूरमधील संगोळ्ळी रायण्णा रेल्वेस्थानकापासून फ्रीडम पार्कपर्यंत मोर्चा काढला.

मानधनवाढीसह विविध मागण्यांची पुर्तता करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱयांची आहे. यापूर्वी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा दखल घेण्यात येत नसल्याने या कार्यकर्त्यांनी ‘बेंगळूर चलो’ची हाक दिली होती. त्यानुसार मंगळवारी राज्यातील विविध जिल्हय़ांतून हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कार्यकर्त्या बेंगळुरात दाखल झाल्या होत्या. मागण्यांचे फलक हाती घेऊन त्यांनी रेल्वे स्थानकापासून फ्रीडम पार्कपर्यंत मोर्चा काढून घोषणा दिल्या. मागण्यांची दखल न घेतल्यास आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

…अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

फ्रीडम पार्कवर मोर्चा दाखल झाल्यानंतर तेथे सभा घेण्यात आली. यावेळी मानधनवाढ, अंगणवाडी कर्मचाऱयांना पेन्शन सुविधा, मोफत वैद्यकीय सुविधा आणि ईएसआय जारी करावी, अशा मागण्या करण्यात आली. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अंगणवाडी कार्यकर्त्या फेडरेशनच्या (एआयटीयुसी) पदाधिकाऱयांनी दिला आहे. याप्रसंगी फेडरेशनच्या वतीने मागण्यांचे निवेदन महिला आणि बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन देण्यात आले.

Related Stories

कर्नाटक विधानपरिषदेत राडा

Patil_p

कर्नाटक ग्रामपंचायत निकालः 5,255 जागांवर भाजप, कॉंग्रेस 3,090 आणि जद (एस) 1,565 जागांवर आघाडीवर

triratna

बेंगळूर: अभिनेत्री रागिणीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Shankar_P

कर्नाटक: २३ नर्सिंग विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

triratna

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक ठरवा: कर्नाटक हायकोर्ट

Shankar_P

श्रीमंत व्यक्तींनी बीपीएल कार्ड परत न दिल्यास कारवाई

triratna
error: Content is protected !!